आजरा (हसन तकीलदार):-गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमिवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आजरा पोलिसांकडून गणेचतुर्थीच्या आधी पोलीस पथ संचलन व दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके करण्यात आली. ज्यामध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस जवान आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठ व गल्ल्यातून वाहनासहित पथसंचलन केले.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि नियमांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी पोलीस पथसंचलन केले जाते. जनजागृती, सुरक्षितता, कायद्याचा आदर आणि नियमांची जाणीव करून देणे हे यामागचे मुख्य उद्देश असतात. सर्वांनी एकत्र येत शांततेत सण साजरा करावा, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाते. आजरा पोलीस ठाण्यापासून तहसील कार्यालय, मुख्य बाजारपेठ व इतर गल्ल्यातून हे पथसंचलन करण्यात आले. आज आजऱ्याचा आठवडा बाजार असलेने व गणपतीचा बाजार करण्यासाठी लोकांची गर्दीही होती. सायरन करीत संचलन केल्याने लोकांचे कुतूहलही वाढले होते. सर्वजण हे पथसंचलन उत्सुकतेने पाहताना दिसले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन व दंगा काबू प्रात्यक्षिके करण्यात आली. आजरा एस. टी. स्टॅंडवर दंगा काबू पथकाद्वारे प्रात्यक्षिके करताना लोकांची गर्दी झाली होती. सर्वजण उत्सुकतेने हे सर्व बघत होते. यामध्ये राखीव पोलीस दलाच्या जवानासह आजरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनीही सहभाग घेतला होता.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



