आजरा (हसन तकीलदार ):- एस.एस.सी.बोर्ड फेब्रु-मार्च 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व्यंकटराव हायस्कूलमध्ये नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित आजरा महाल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी,पालक,दाते,हितचिंतक,गावातील सन्माननीय व्यक्ती यांचे स्वागत नूतन मुख्याध्यापक एम.एम. नागुर्डेकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक कृष्णा पटेकर होते.अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की,शाळेच्या भौतिक सुविधा आम्ही पुरवल्या आहेत मात्र गुणात्मक विकासाकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तसेच पुढील शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक करिअरच्या वाटा शोधाव्या लागतील 1932 पासून स्थापन झालेल्या या आजरा तालुक्याच्या खेडोपाड्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी घडविणाऱ्या आपल्या व्यंकटराव शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व गुणात्मक विकास करणे हेच खरे ध्येय आहे. मात्र स्पर्धा कुणाशीही नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.

संचालक सचिन शिंपी यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, शाळेतील विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहे त्यापेक्षा पुढे जाऊन आपण शाळेच्या नावलौकिकात भर घालण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,विद्यार्थ्यांना एकाच छताखाली पहिलीपासून पदवीपर्यंतचे उच्चतम व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत त्या दृष्टीनेच अकॅडमी सुरू केल्याचे सांगितले. तसेच इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही आणखीन प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सन्मान,सत्कार व वेगवेगळी पारितोषिके देऊन सन्मान केला जाईल असे सांगितले.

माजी शिक्षक एस. जी. इंजल यांनीही आपले मनोगत व्यक्त केलेशाळेत पहिले पाच आलेले विद्यार्थी पेडणेकर प्रणव बाळकृष्ण(प्रथम), पाटील प्रथमेश विजय(द्वितीय), प्रभू गौरव तुकाराम( तृतीय), गिलबिले आसावरी अशोक(चतुर्थ), कविटकर शार्दुल लक्ष्मण(पाचवा ),होरटे दिव्या परशुराम, सासुलकर प्राची धनाजी, पोवार वैष्णवी सदानंद. याबरोबर आजरा तालुक्यातून केंद्रात मृणाली संदीप तेजम (रोझरी हायस्कूल),प्रथम आलेली विद्यार्थिनी, कस्तुरी तुरंबेकर (भादवण हायस्कूल भादवण) संस्थेच्या तिन्ही शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. तसेच प्रत्येक विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी गौरव करण्यात आला.सन 2004-2005 सालचे माजी विद्यार्थी डॉक्टर रोहन जाधव व सुयोग जाधव यांनी आपल्या बॅच कडून शाळेला वह्याची भेट दिली. तसेच इयत्ता दहावी, एम.टी.एस.व स्कॉलरशिप मार्गदर्शक शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर यांनी एसएससी परीक्षेतील या गुणवंत विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. बक्षीस वाचन व दात्यांचा नामोल्लेख सौ.ए.एस.गुरव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार सुनील पाटील, संचालक पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील, भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.जी कुंभार, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक जी.बी ढेकळे, एस.जी. इंजल, डॉ. रोहन जाधव, सुयोग जाधव, दाते व पालकवर्ग उपस्थित होते.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार व संस्कृत अध्यापिका सौ.एस. डी .ईलगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. आर.एन. पाटील यांनी केले तर आभार श्रीम.एस.के. कुंभार यांनी मानले.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक



