अमित गुरव –: दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये प्रसूती साठी गेलेल्या सुशांत भिसे कुटुंबीयांना पैसे भरा असा तगादा लावून त्यांना चुकीची वागणूक दिली होती. या पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या झालेल्या निंदनीय प्रकाराचा निषेध करीत आहोत मृत्यू पावलेल्या ताई यांच्या स्मृतीला अभिवादन करताना त्यांच्या दोन्ही जुळ्या बाळांना उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभो अशी याचना करीत राहू.
हा सगळा प्रकार अतिशय चीड आणणारा असून हॉस्पिटल प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार असल्याचे आम्ही मानतो.

इथून पुढे अशा प्रकारांमध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्य कक्षाला संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्ष प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांनी केले.
. सध्या धर्मादाय रुग्णालयात नक्की काय आणि कोणते प्रकार चालू आहेत ते डोळे उघडून पाहण्याची वेळ आली आहे असे नानाविध मेसेज आणि चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येते की ते झोपेचे सोंग घेणार याकडे जनता डोळे लावून बसली आहे .

मुख्यसंपादक