आजरा (हसन तकीलदार ):-आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व गल्ल्या तसेच कॉलनीतील पथदिवे तसेच रस्त्याबाबतच्या व्यवस्थेची पार दुर्दशा झाली आहे. एकेका गल्लीत जवळपास 6ते 7महिने झाले रस्त्यावरची दिवाबत्ती बंद झाली आहे.वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे गटारी व नवीन नळकनेक्शनसाठी रस्ता खुदाई झालेमुळे आणि यावर्षी मे महिन्यापासूनच संततधार पाऊस पडत असलेमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यामध्ये मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे भरणे बाबत व पथदिवे दुरुस्तीबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना निवेदन दिले आहे.

आजरा शहरात बहुतांशी भागात पथदिवे सुरु नाहीत तर काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण व गटारीसाठी जुने लाईट खांब काढले असलेने त्याठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. अशा ठिकाणी नवीन पोल बसवून पथदिव्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. पाण्याच्या टाकीजवळ, गांधीनगर नेवरेकर वसाहतीमध्ये, वाडागल्ली बोळामध्ये नवीन पोल बसवण्याची गरज आहे तर दत्त कॉलनी, आझाद कॉलनी, सिद्धीविनायक कॉलनी, साई कॉलनी, गोठण गल्ली, समर्थ कॉलनी, नाईक गल्ली, परोली रस्ता, पारपोलकर वसाहत, शिवाजीनगर ते घाट रस्ता, समाधीजवळ, मेनरोड दर्गागल्ली, रांगणेकर बोळ व साळगाव रोड याठिकाणी पथदिवे बसवून कार्यन्वयीत करणे गरजेचे आहे. अनेक मोक्याच्या ठिकाणचे हायमास्ट दिवे बंद आहेत ते हायमास्ट दिवे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरात नवीन पाणी योजना व पावसामुळे संपूर्ण आजरा शहरात चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अशा ठिकाणी वाहन चालविणे किंवा नागरिकांना, विद्यार्थ्यांना चालणे जिकरीचे झाले आहे. साई कॉलनी, राईसमिल परिसर, जोशी गल्ली, गांधीनगर येथील ओढ्याचे ठिकाण, दर्गागल्ली, नाईक गल्ली, कुंभार गल्ली आझाद कॉलनी इ. ठिकाणी तात्पुरते मुरूम टाकून नागरिकांच्या समस्येचे निराकरण करावे. त्यानुसारच व्यंकटराव हायस्कुल ते मिनर्वा हॉटेल पर्यंतचे पावसाचे पाणी पूर्ण रस्त्यावरून वाहत आहे. गटारीत जाण्यासाठी कोठेही नियोजन केलेले दिसत नाही त्याची पाहणी करून ड्रेनहोल अथवा पाईप घालून सदरचे पाणी गटारीत सोडण्यासाठीचीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर परशुराम बामणे (अध्यक्ष ), गौरव देशपांडे (उपाध्यक्ष ), पांडुरंग सावरतकर (सचिव ), सुधीर कुंभार (अध्यक्ष सल्लागार समिती ), बंडोपंत चव्हाण, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, वाय. बी. चव्हाण, अशोक गाडे, मदन तानवडे, दिनकर जाधव आदींच्या सह्या आहेत.
*सद्या नगरपंचायतीकडे मनुष्यबळ कमी आहे, बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी अजून नवीन भरती झालेली दिसत नाही. स्वछता विभागकडील (सॅनिटेशन), प्लम्बर व वीज कर्मचारी, शिपाई यांची कमतरता असल्यामुळे अधिकाऱ्यांना कामे करून घेताना मर्यादा येत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. त्यामुळे नवीन कर्मचारी भरती करणे गरजेचे आहे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक



