वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन दिनांक ४ मार्च ते १० मार्च राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना येथे विविध कार्यक्रमानी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या सत्रात कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाषराव देसाई यांच्या शुभहस्ते सुरक्षितता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.

दुसऱ्या सत्रात कोल्हापूर येथील ट्रेनर शिरीष पाटील यांचे कडून सर्व कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षितता याविषयी ट्रेनिंग देण्यात आले. यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक मुकुंद दादा देसाई, प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, जनरल मॅनेजर एस के सावंत ,चीप इंजिनियर सुरेश शिंगटे ,कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई ,सॅनिटरी निरीक्षक आर एन देसाई, लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर ,कोल्हापूर येथील कामगार कल्याण अधिकारी( महाराष्ट्र शासन )विजय शिंगाडे, केंद्र संचालक संघशन जगतकर यांची प्रमुख उपस्थिती होती .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी केले.

मुख्यसंपादक