भादवण गावाच्या विद्यमान सरपंच सौ. माधुरी गाडे यांच्यावर अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ५ मार्च रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रमुख मंडळींनी कंबर कसली आहे. विरोधक आणि समर्थक हे दोघेही सक्रिय होत असून सध्या वातावरण तापण्याची सुरवात होत आहे.

- तालुक्यात चर्चा मात्र मतदार शेतात
नुकत्याच पार पडलेल्या श्री. महालक्ष्मी यात्रेला विमानाने प्रवासाठी आलेल्या भाविकांचे हेच ते भादवण गाव . आता अविश्वास ठराव मुळे तालुक्यात लोक भादवण करांचीच हवा म्हणत असले तरी शेतकरी मतदार मात्र ऊस लागण करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे प्रबळ प्रचार चालू कधी होणार हे पंगती उठल्यावर कळेल ? असा उपहासात्मक टोला काही नागरिकांच्या कडून होतोय.
येत्या काळात ठरेल जनता सरपंचांना पास करते की नापास ?

मुख्यसंपादक