कोल्हापूर ( शिवाजी यादव ) -: कोल्हापूर शहरातील बालकल्याण संस्था ही १०४ वर्षांची अविरत परंपरा जपणारी संस्था यंदाही आपले सामाजिक भान जपत पुढे सरसावली. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात १२५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कोल्हापूर धान्य व्यापाऱ्यांच्या प्रेरणेतून १२५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | १०४ वर्षांची अविरत परंपरा कायम
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. विशेषतः २७ होतकरू विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
कोल्हापूर धान्य व्यापाऱ्यांच्या प्रेरणेतून १२५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | १०४ वर्षांची अविरत परंपरा कायम.
कोल्हापूर धान्य व्यापाऱ्यांच्या प्रेरणेतून १२५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | १०४ वर्षांची अविरत परंपरा कायम
कोल्हापूर धान्य व्यापाऱ्यांच्या प्रेरणेतून १२५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | १०४ वर्षांची अविरत परंपरा कायम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष वैभव सावर्डेकर होते. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत मोफत अभ्यासिका उपक्रमाची माहिती दिली व गोरगरीब विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तानाजी दळवी यांनी आपल्या मनोगतात म्हटले, “मीही शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. अशा सामाजिक संस्थांमध्ये काम करताना विशेष समाधान मिळते. बालकल्याण संस्थेचा उपक्रम देशाच्या भावी पिढीला दिशा देणारा आहे.”—
कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे विशेष गौरवकोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी बालकल्याण संस्थेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून सर्व संचालक व सभासदांना शुभेच्छा दिल्या.—कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थितीया उपक्रमास कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजूभाई परीख, विवेक शेटे, विजय कागले, अमर क्षिरसागर, विवेक नष्टे, श्रीनिवास मिठारी, सुरेश लिबेकर, अभयकुमार अथणे यांच्यासह अनेक व्यापारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विजय कागले यांनी, परिचय विवेक शेटे यांनी केला तर आभारप्रदर्शन विवेक नष्टे यांनी केले.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक