श्रावणी म्हणजे हिंदू धर्मीयांसाठी विशेष पर्वणी आहे.श्रावण मास म्हणजे धार्मिक मास .सर्वांचे प्रिय देवाधिदेव महादेव यांचे विशेष पर्व म्हणजे श्रावण.देशभरातील लाखो शिव मंदिरामध्ये भक्तजन परंपरेने श्रावणामध्ये दर्शन व पूजा विधीसाठी जात असतात आणि आपला भाव महादेव चरणी अर्पण करीत असतात .अनेक तीर्थक्षेत्री भेट देण्यासाठी भक्त भाविक साधक इच्छुक असतात .
श्रावणी पौर्णिमा यातील एक महत्त्वाचा दिवस .या दिवशी समुद्र शांत झाल्यामुळे समुद्राची पूजा करून कोळी लोक आपले काम पुन्हा चालू करतात . श्रावणात सर्वत्र हिरवेगार आल्हाददायक वातावरणामध्ये अनेक सण येतात . श्रावणी पौर्णिमा हा राखी पौर्णिमा रक्षाबंधन दिन म्हणून देशभर पाळला जातो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिन म्हणून हा सण !
श्रावणी सोहळा
श्रावणी पौर्णिमेस अनेक ठिकाणी श्रावणी सोहळा आयोजित केला जातो . भगवान शंकराचे पूजक , उपासक ,अनुयायी ,शैव पुरोहित , वैष्णव पुरोहित व शिव इतर देवतांना आराध्य मानणाऱ्या लोक या दिवशी एकत्र येतात. जानवी बदलण्याचा हा दिवस होय.महाराष्ट्रभर सई व पुरोहितांच्या या कार्यक्रमास शैव उपासक तेली , वाणी , लिंगायत , गोसावी , जंगम , सुतार , कुंभार , माळी ,शैव ब्राम्हण इ. शैवसमाज उपासक बहुसंख्येने कार्यक्रमास एकत्रित येतात .
शैव पुरोहितच्या सेवेत सर्व एकत्र येऊन या दिवशी भगवान महादेवांची आराधना करतात .शिवपूजा शिवाभिषेक शिवदीक्षा असे कार्यक्रम असतात .प्राचीन परंपेनुसार श्रावण पौर्णिमा या दिवशी शिक्षणाचा आरंभ दिन शिवालयात साजरा केला जात होता .’नवीन शिष्य गुरूंच्या कडून शिवदीक्षा घेऊन गुरुगृही शिक्षणासाठी जात .तर शिक्षण पूर्ण करणाऱ्यास गृहस्थाश्रमात प्रवेशासाठी मार्गदर्शन दिले जाई .
या दिवशीविचार मंथनासाठी भागातील शैव पुरोहित व शैवलोक एकत्र जमत .श्रावणी पौर्णिमेस अवनी नावाचा तमिळ लोक ‘अवनी अवित्तम’ म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. दक्षिण भारतात श्रवण नक्षत्री साजरा होणारा ओनम हा सण म्हणजे कृषीसंस्कृती आणि बळीराजाचा गौरव दिनच!
एकूणच श्रावण म्हणजे भगवान महादेवांच्या आशीर्वादाने पुनीत पावनपवित्र असा धार्मिक महिना !आणि श्रावणी म्हणजे शैव परंपरेचें स्मरण! श्रावणीच्या अनुषंगाने दरवर्षी शैव परंपरेतील घटक शिव वा त्याचे प्रभावळीतील मंदिरामध्ये एकत्र येतात. आपली हिंदू संस्कृती जोपासणारा हे घटक पौर्णिमेस श्रवण नक्षत्री शैव विचारांचा उजाळा देत भगवान महादेवांचा जयघोष करीत श्रावणी सोहळा उत्साहाने साजरा करीत असतात .
अनेक ठिकाणी प्रथमत: शिवमंडपामध्ये भगवान शिवांच्या मूर्तीची स्थापना होते. यथासांग शिवपूजा होते..शिवगौरव(शिवकार्याची उजळणी) पूजा व शिवाभिषेक करण्यात आला .शिवकथा वाचन गायन मंगलवाद्य वादन नृत्य याने शिवाने दिलेल्या परंपरेचे मंगल स्मरण होते. रणशिंग तुतारी शंखनाद हर हर महादेव , जयभवानी नाद करीत सनई चौघड्यांनींही शिवशक्तीचा गौरव करण्यात येतो. भगवान शंकरांच्या पासून सुरू झालेल्या विविध परंपरांचा (गुरुपरंपरा ,योग,कला ,औषधशास्त्र , युद्धशास्त्र , कृषीशास्त्र) गौरव करून त्यांचे स्मरण होते. त्यानंतर सर्व उपस्थितांना जानवी नूतनीकरण शिव दीक्षा देण्यात येते. यामध्ये हिंदू बांधवांनी दैनंदिन जीवनामध्ये व धार्मिक जीवनामध्ये कोणती आचारसंहिता पाळावी याविषयी उपाध्याय बोलतात..यानंतर परंपरेने शिवमंडपामध्ये भगवान शिवांच्या साक्षीने विचार सभाहोते .
शेवटी आभार मानून करण्यात आला .त्यानंतर शिवप्रसाद वाटप व स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला .
– : यमाई औंध राजेंद्र गुरव
मुख्यसंपादक