आजरा (हसन तकीलदार ):- सुलगाव ता. आजरा येथील कु. सिद्धी अनिल देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत राज्य कर निरिक्षक वर्ग-२(STI) पद संपादन केले.
कु. सिद्धी चे प्राथमिक शिक्षण सुलगाव शाळेत तर माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे झाले. तीने पुढील शिक्षण साधना ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथून घेऊन, शासकीय महाविद्यालय कराड मधून बी.फार्मसी डिग्री घेतली. प्राथमिक शाळेपासूनच तीने येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, ४ थी, ७ वी तसेच एन.एन.एम्.एस. अशा अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या आहेत. तीने बी. फार्मसी डिग्री घेतानाही चार वर्षे एफ्. एफ.ई. फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपल्या घरी सुलगांव येथे एम. पी. एस. सी. चा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात तीला यश मिळाले. त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपल्या या यशाचे श्रेय तीने आपले काका, आई-वडील यांचे बरोबरीने अंगणवाडी सेविकां पासून प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, काॅलेज महाविद्यालय प्राध्यापक तसेच स्वामी विवेकानंद क्लासेस मुरगूडचे शिक्षक आणि गंगामाई वाचन मंदीर व झेप अकॅडमी आजराचे ग्रंथालय स्टाफ व मार्गदर्शन लाभलेल्या सर्व शिक्षक आदींना देत असलेचे सांगितले.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



