आजरा ( अमित गुरव ) -: आजरा तालुक्यातील लोकांना टोलचा भुर्दंड कायमचा हटवण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी आजरा तालुक्यातील जनतेवर लावलेला टोल हा अन्यायकारक असून कोणत्याही प्रकारची मागणी नसताना आणि जनता तसेच लोकप्रतिनिधी ना विश्वासात न घेता राष्ट्रीय महामार्ग केला पण तोही फक्त दोन पदरी करून टोल वसुली कंपनी कडून वसुली करण्याचे नियोजन आहे. सदरचा महामार्ग हा जनतेच्या पैशातून केंद्र शासनाच्या निधीतून केलेला त्यात कोणाचीही मागणी नसताना तसेच निविदा न काढता रस्ता केला असेल तर हा टोल कश्यासाठी ? निधी केंद्र शासनाचा असेल तर महाराष्ट्र शासनाने केंद्राला पैसे द्यावेत . आणि शेतीप्रधान तालुक्याला कष्टाचे पैसे मोजावे लागू नयेत त्यामुळे टोल नाका हद्दपार करावा अशी मुख्य मागणी आहे. राष्ट्रीय महामार्ग नियमानुसार एकाही नियमात हा रस्ता बसत नाही. त्यामुळे टोल नकोच यावर आम्ही ठाम आहोत. मागील मोर्च्यात दिलेला शब्द दोन मंत्री आणि दोन आमदार यांनी पाळावा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा व टोल नाका हद्दपार करावा अशी मागणी संपत देसाई यांनी केली.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आपल्याला सकारात्मक लेखी उत्तर देतील . त्यांची त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. आपण बसून त्यावर मार्ग काढू असे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणाले. या आंदोलनाला मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा या तालुक्यातील सर्व डॉक्टरांच्या संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला. यावेळी परशुराम बामणे , मुकुंददादा देसाई , सुधीर देसाई , वसंतराव धुरे , प्रभाकर कोरवी , गौरव देशपांडे , शांताराम पाटील, राजू सावंत , युवराज पोवार, डॉ. त्रिरत्ने, डॉ. सुधीर हरेर, अनिरुद्ध केसरकर , दयानंद भोपळे , कॉ. शिवाजी गुरव , पी.जी. पाटील , संजय घाटगे, सहभागी झाले होते.
मुख्यसंपादक