कोल्हापूर ( अमित गुरव )-:
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक काल सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथे पार पडली. देशभर वाढलेल्या कार्यक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे नाव बदलून “ऑल इंडिया डिजिटल मीडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशन (AIDMEJ)” असे करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बैठकीत राजा माने यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे घोषणा करण्यात आली
राष्ट्रीय कार्यकारिणी
राष्ट्रीय अध्यक्ष: राजा माने
राष्ट्रीय उपाध्यक्ष: महेश कुगावकर, अमोल पाटील
राष्ट्रीय सचिव: तेजस राऊत
राष्ट्रीय सहसचिव: नंदकुमार सुतार
राष्ट्रीय समन्वयक: दीपक नलावडे, राजू वाघमारे, मुरलीधर चव्हाण, सूर्यकांत वायकर, अमित इंगोले
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली आणि मध्य प्रदेश राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत सविस्तर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
प्रदेशाध्यक्ष: सतीश सावंत (सांगोला)
प्रदेश महासचिव: विकास भोसले (कराड)
प्रदेश उपाध्यक्ष: इकबाल शेख (अहिल्यानगर)
राज्य संघटक: दीपक मांगले
प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची नव्याने निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांनी सूचित केले.
संघटनेच्या वतीने प्रिंट मीडिया साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम (सातारा) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. प्रिंट मीडिया संपादक पत्रकारांनी या विभागात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील, तर मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण खारीवाल यांची निवड जाहीर करण्यात आली असून दिल्ली व तेलंगणा राज्यांतील नियुक्त्या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
बैठकीत इकबाल शेख, सुभाष चिंधे, मनोहर पवार, गणेश बोतालजी, सुहास पाटील, दीपक मांगले, विनायक कलढोणे, संजय कदम, शशिकांत देशमुख, संतोष शिराळे, सचिन भिलारे, सोमनाथ साखरे आणि भाऊसाहेब फास्के यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीसंदर्भात स्पष्ट दिशा दिली. त्यांच्या सूचनेनुसार राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील जुन्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या असून नव्याने रचना केली जाणार आहे (सातारा, सांगली व सोलापूर जिल्हा वगळता).
सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातील सभासदांची संपूर्ण माहिती — चॅनल नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, जन्मतारीख व लग्नदिनांक — संघटनेच्या अधिकृत ईमेलवर तात्काळ पाठवावी, असे निर्देश देण्यात आले.
येत्या एक महिन्यात राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने राज्यभर दौरा करणार असून नव्याने जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
ही माहिती प्रदेश महासचिव विकास भोसले यांनी Link Marathi शी बोलताना दिली.

मुख्यसंपादक



