आजरा (हसन तकीलदार)*:-संकेश्वर -बांदा महामार्ग आजरा वासियांना सोयीचे कमी आणि डोकेदुखी मात्र जास्त असल्याचे जाणवत आहे. विविध पक्ष, संघटना एकत्र येत येथील टोलनाक्याला विरोध केला आहे. त्याचप्रमाणे आजरा येथे मोटर मालक व चालक यांची न्यू आजरा रोडलाईन्स सहकारी वाहतूक संस्था कार्यरत असून या संस्थेने आपल्या ट्रक मालक चालकांच्या अडचणी, सद्याची ट्रक वाल्यांची व्यवसायाची परिस्थिती,वाढते डिझेल दर, प्रत्येक गोष्टीला आकारले जाणारे कर, वाहन पासिंगसाठी असलेले नियम व दंड, वाहन दुरुस्ती देखभालीचा खर्च या सर्वांचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागते. अशातच पुन्हा आता एम. आय. डी. सी. जवळ परत टोल टॅक्स सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. याला विरोध करीत हा टोल बंद करावा अशी मागणी न्यू आजरा रोडलाईन्स संस्थेने केली असून याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ट्रक व्यावसायिक अनेक अडचणीत आहेत. सर्व प्रकारचे कर अगोदरच लावले आहेत. रस्त्यावरील सर्व कर लागू आहेत. डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. ट्रक दुरुस्तीचेसुद्धा दर वाढले आहेत. परंतु भाडेदरामध्ये मात्र काहीही बदल झालेला नाही. ट्रक व्यवसाय पूर्णपणे तोट्यात आहे. ट्रकमालक सरकारला रोडटॅक्स, इन्शुरन्स टॅक्स, पर्यावरण टॅक्स, व्यवसाय कर, प्रदूषण कर आशा अनेकविध प्रकारचे कर देतो. आशा परिस्थितीत सरकारचे नवनवीन टोलनाके वाढतच जात आहेत. या टोलमुळे खर्चात अधिकच भर पडत आहे.त्यामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत येत आहे. सरकारने ट्रकवाल्याना कोणत्याच सेवा सुविधा आजपर्यँत दिलेल्या नाहीत. रस्त्यावरचा इतर त्रास तर न बोलण्यापलीकडचा आहे.
या सर्व बाबींचा विचार करून आजऱ्यामध्ये एम. आय. डी. सी. जवळील नियोजित असणारे टोल टॅक्स बंद करावे असे निवेदन देण्यात आले आहे.निवेदनावर सिलेमान नसरदी, नियाज तकीलदार, युसूफ भडगावकर, इसाक नेसरीकर, इस्माईल काकतिकर, मुनाफ खेडेकर, नजीर लमतुरे, सहदेव कांबळे, मोहसीन नेसरीकर, रामचंद्र गुरव, इरफान ढालाईत, शाहिद दरवाजकर, अनिल पाटील, रहुफ काकतिकर, अल्लबक्ष खेडेकर, आब्बास सोनेखान, बळीराम वास्कर, जुबेर भडगावकर आदींच्या सह्या आहेत.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



