Homeघडामोडीआमच्या कामाची दखल घ्या… फक्त एवढीच अपेक्षा

आमच्या कामाची दखल घ्या… फक्त एवढीच अपेक्षा

आजरा (हसन तकीलदार ):-दोन मिनिटं लाईट गेली तर आम्ही नको ते बोलतो, वायरमन आणि वीज खात्याला कोसतो, अनाप शनाप बोलतो परंतु ते कोणत्या परिस्थितीत काम करतात याचं भान आपल्याला नसतं.धो धो पावसात काम करताना त्यांची काय अवस्था होते याचा काडीचाही विचार आमच्या मनाला स्पर्शून जात नाही.

आज नाईक गल्ली आजरा येथील एका घरातील वीज बंद पडली होती. त्याचे वर्क फ्रॉम होमचे काम थांबले होते. कंपनीकडून विचारणा होत होती. त्याने आपली अडचण सांगितली तेव्हा धो पावसाचाही विचार न करता सुनील पाटील (वरिष्ठ तंत्रज्ञ )व लहू कापडूस्कर (बाह्यस्तोत्र कर्मचारी )यांनी वीज जोडणीचे काम केले. असल्या पावसात आम्हाला घराबाहेर पडायला जमत नाही तर हे कर्मचारी असल्या पाऊस, वाऱ्यात जीव धोक्यात घालून काम करतात… झाड पडलं, वायरी तुटल्या अशा पावसात ते काम करीत असतात.

आम्हाला मात्र पाच मिनिटं धीर धरता येत नाही. लाईट कधी येणार, लाईट कधी येणार म्हणून गोंधळ घालतो.सलाम आहे यांच्या कार्याला.. यांचे पडद्यामागील कार्य लोकांच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे.त्यांच्याही अडचणी आणि कामे आपल्याला समजलं पाहिजे.

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular