Homeघडामोडीमल्टिस्टेट आजरा अर्बन सह बँकेची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

मल्टिस्टेट आजरा अर्बन सह बँकेची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

आजरा (हसन तकीलदार):-तालुक्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यापासून सर्वांना आर्थिक गरज पूरवणारी आजऱ्यातील दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह (मल्टीस्टेट)बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत पार पडली. यावेळी संपलेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा अहवाल व लेखापरीक्षकांनी तपासलेला ताळेबंद, नफा -तोटे पत्रके, सन 2023-24सालच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे, अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाला मंजुरी देणे, सन 2025-26वर्षासाठीच्या अंदाज पत्रकास मान्यता देणे., समवर्ती हिशोब तपासणीस नेमणूकीचे अधिकार संचालक मंडळास देणे, एकरकमी कर्ज परतफेड व इतर योजनेंतर्गत व्याज व इतर वसुली खर्चात सूट, पोटनियम दुरुस्तीस मान्यता इ. महत्वाच्या विषयावर ही वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


सुरवातीस स्वागत, प्रास्ताविक व मनोगत बँकेचे चेअरमन अशोकआण्णा चराटी यांनी मांडले. यावेळी त्यांनी बँकेच्या 31मार्च 2025रोजी संपलेल्या वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंद आणि नफा तोटा पत्रके तसेच बँकेच्या व्यवसायाने आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेचा एकूण व्यावसाय दि. 31मार्च 2024च्या रु. 151756लाखावरून रु. 16397लाखाने म्हणजेच 10•80टक्क्यानी वाढून दि. 31मार्च 2025रोजी रु. 168153 लाखावर पोहचला आहे. ठेवी रु.89903लाखावरून रु.12666लाखाने म्हणजे 14•09टक्क्यानी वाढून रु. 102569लाखावर पोहचल्या आहेत. कर्जामध्ये सुद्धा 6•03टक्क्यांची वाढ झालेली आहे. तर या आर्थिक वर्षात रु.385लाख इतके एन.पी.ए.कर्ज वसुली केलेने आर्थिक वर्षाअखेरीस रु.2042लाख इतके एन.पी.ए.कमी करण्यात यश आले असलेबद्दल सांगण्यात आले. बँकेने रिझर्व बँकेच्या निकषाचे पालन करीत रु. 25लाखापर्यंतच्या कर्ज खात्यामधील व्यावसाय हा बँकेच्या 62•61%इतका आहे. बँकेने कर्जावरील रिबेट योजना सुरु केली असून ग्राहकांनी कर्जे वेळेत परतफेड करून रिबेट योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई यांची कर्ज योजना सुरु केलेली असून या योजनांचाही लाभ घ्यावा असेही अशोकअण्णांनी सांगितले.


त्यानंतर सभा नोटीस, विषयपत्रिका वाचन प्रशांत गंभीर (मुख्य कार्यकारी अधिकारी)यांनी केले. त्याचबरोबर सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देत सभासदांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. यावेळी माजी संचालक आर. डी. पाटील यांनी यावर्षी नफा जास्त असलेले 10%लाभांश ऐवजी 12%लाभांश सभासदांना द्यावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे मशनरी व वाहनासाठी कर्जे देताना योग्य तारण घेऊन कर्जे द्यावीत असेही मत मांडले. गोवा येथे नवीन शाखा सुरु करावी असे सूचित केल्यानंतर अशोकअण्णांनी गोवा येथे नवीन शाखा सुरु करणेत येईल असे सांगितले. सभासद किरण तानवडे यांनी 1000कोटी ठेविंचा टप्पा पार झालेबद्दल बँक व्यवस्थापन व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी तुळसाप्पा पोवार या शेतकरी सभासदाने आपल्या रांगड्या आणि गावठी भाषेत आपला प्रश्न मांडत सूचना केली की, जादातर सभासद हे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत. त्यांना जीव धोक्यात घालून शेतात राबवं लागतं, हत्ती, वाघ, गवे, यापासून नुकसान होतंय तेव्हा अशा सभासदांना बँकेने नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी. दिवाकर नलवडे यांनीही प्रश्न विचारला. अशोकअण्णांनी बँकेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन चार मजली शानदार इमारत यावर्षीपासून बांधणार असलेबाबत सांगितले.


यानंतर 75वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचे उपस्थित संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर विशेष सत्कार म्हणून सुधीर (बापू )कुंभार यांची भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल चेअरमन अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते तर अनिकेत चराटी यांची भाजपा तालुकाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल व्हा. चेअरमन संजय चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार संचालक विलास नाईक यांनी मानले. यावेळी सुरेश डांग, डॉ. दीपक सातोस्कर, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ प्रणिता केसरकर, सौ अस्मिता सबनीस, श्रीमती शैला टोपले, सूर्यकांत भोईटे, सुनील मगदूम, किरण पाटील, ऍड सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे, माजी संचालक हसन शेख, डॉ अंजनी देशपांडे आदिसह सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular