आजरा (प्रतिनिधी) :
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हरपवडे या विभागात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचा उत्साहपूर्ण माहोल पाहायला मिळाला. गतवर्षी वंदनीय छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने उभारण्यात आलेल्या या ध्वजस्तंभाने गावागावांत शिवकालीन इतिहासाची प्रेरणा देत असंख्य शिवभक्त, युवक आणि समाज घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे.
📌 सोहळ्यातील प्रमुख क्षण
या सोहळ्यात पुन्हा एकदा शौर्य, पराक्रम, संस्कार आणि संघटन यांचा जागर करण्यात आला.
मा. तुकाराम बाळू गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मा. श्रावण वसंत पोवार यांनी कार्यक्रमासाठी खाऊ वाटप केले.
मा. आदर्श हळवणकर यांनी वर्षभरातील कार्याचा अहवाल सादर करून आगामी नियोजनाचे मार्गदर्शन केले.
📌 मान्यवर व उपस्थिती
या कार्यक्रमाला कुमार महादेव पाटील, आकाश परशुराम जाधव, अनिकेत लटम, श्रावण धाटोंबे, रामराव जाधव, तुकाराम गुरव, सुरेश सावंत, महादेव पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजस्तंभाच्या या सोहळ्याने पुन्हा एकदा गावकऱ्यांत शिवभक्ती, ऐक्य आणि संघटनेचा संदेश दिला.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



