Homeघडामोडीगडहिंग्लज मध्ये डॉक्टर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

गडहिंग्लज मध्ये डॉक्टर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

गडहिंग्लज -: तक्रारदार यांचे मित्र १० / १ / २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चक्कर येऊन खाली पडले होते तेव्हा त्यांच्या खुब्यास मार बसला होता. ११/१/२०५ रोजी सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी १३/१/२५ रोजी स्वराज्य हॉस्पिटल गडहिंग्लज मध्ये ऍडमिट केले. तेथील डॉक्टर अजित वसंतराव पोटोळे यांनी हे ऑपरेशन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचे ठरवून सदरचे ऑपरेशन योजनेत बसवण्यासाठी २० हजारांची मागणी केली होती असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यातील १० हजार रुपये १५ /१ /२५ रोजी डॉ. पाटोळे यांनी घेतल्यानंतर १६/१/२५ रोजी ऑपरेशन झाले.


सदर शासकीय योजना व या योजनेअंतर्गत केलेले औषधोपचार हे पूर्णपणे मोफत असताना देखील या योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. पाटोळे आणि प्रशासक ( खासगी इसम ) इंद्रजित शिवाजीराव पाटोळे यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची मागणी केली आणि उर्वरित १० हजार रुपयांच्या बदल्यात ८ हजार रुपयात तडजोड करून ती रक्कम इंद्रजित पाटोळे यांच्याकडे देण्यास सांगितली ती घेताना आज दिनांक २०/१/२५ रोजी त्याला रंगेहाथ पकडले.
या सापळा लावण्यात श्री. शिरीष देशपांडे पोलीस अधीक्षक , ला प्र वि पुणे परीक्षेत , श्रीमती शीतल जानवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुणे , श्री. विजय चौधरी अपर पोलीस पुणे , श्री. वैष्णवी पाटील पोलीस उपअधीक्षक , कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंखे , सहा. पो. उपनिरीक्षक सुनील मोरे , पो. हवालदार सुनील घोसाळकर , संदीप काशीद , पो. नाईक सचिन पाटील, पो. कॉन्स्टेबल संदीप पवार , चालक सहा. फौजदार गजानन कुराडे यांनी काम पाहिले .

लाचलुचपत विभागाने कोणी लाच मागितल्यास त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी संपर्क साधण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. कोल्हापूर विभाग – ०२३१/ २५४०२८९
हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक – १०६४
व्हॉट्सॲप – ७८७५३३३३३३

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular