Homeघडामोडीइम्रानभाई युवा मंचचे विधायक कार्य कौतुकास्पद

इम्रानभाई युवा मंचचे विधायक कार्य कौतुकास्पद

आजरा (हसन तकीलदार ):-येथील नाईक गल्ली येथे कार्यरत असणाऱ्या इम्रानभाई युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी दीडबाग वासहतीमध्ये स्वखर्चाने श्रमदान करीत रस्त्यावरील खड्डे व चरी मुजवून विधायक कार्य केलेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


प्रजापीता कॉलनी लगत असलेल्या दीडबाग वासहतीमध्ये रस्त्यावर तिव्र उतार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून निम्म्यापर्यंत गटारी व रस्त्याचे काम करणे बाकी आहे. यावर्षी पावसाचे प्रणाम जास्त असलेने रस्त्यावरील उतारावर मोठ मोठ्या चरी व खड्डे पडले होते त्यामुळे या ठिकाणी कचरा गाडी किंवा चार चाकी वाहन येणे बंद झाले होते. नगरपंचायतकडे एक महिन्यापासून मागणी केल्यानंतर एका खड्ड्यात थोडेसे मुरूम व दगडे टाकण्याचे सोपस्कर त्यांनी पार पाडले. परंतु त्यांनी टाकलेल्या दगडांच्यामुळे उलट वाहने येताना अडचणी येऊ लागल्या. कचरा गाडीसुद्धा येणे बंद झाली होती. अडचणीच्या किंवा तातडीच्या वेळी वाहन आणणे मुश्किलीचे झाले होते. शेवटी इम्रानभाई युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष इम्रानभाई लमतुरे यांनी ही परिस्थिती आपल्या मंचच्या कार्यकर्त्यांना सांगितली. मंचच्या कार्यकर्त्यांनी कोणताही विचार व विलंब न करता स्वतः वर्गणी काढून मुरूमचे ट्रॅक्टर मागवून स्वतः श्रमदान करीत रस्त्यावर मुरम पसरून घेतला. रात्री पावसात भिजत रस्त्यावर पडलेल्या चरी व खड्डे भरून घेतल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर कचरा गाडी आत खाली येऊ शकली त्याबद्दल तेथील महिलांनी युवा मंचच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. लोकप्रतिनिधी नाहीत आणि नगरपंचायत प्रशासन दखल घेत नाही अशा वेळी लोकांनी करायचे काय? असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. शेवटी नाईलाजाने आम्ही स्वतः मुरूम विकत आणून रस्त्यावरील खड्डे भरले अशी खंत अध्यक्ष इम्रानभाई लमतुरे यांनी मांडली.


यावेळी नियाजभाई तकीलदार, इम्रानभाई लमतुरे, मुस्तकीम लमतुरे, नदीमभाई तकीलदार, महंमदजुबेर दीडबाग, लियाकत दीडबाग, वसिम मुल्ला, झहीर दीडबाग, इरफान दीडबाग, तमीम मुल्ला आदिजण उपस्थित होते.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular