Homeघडामोडीआजऱ्यात त्या जखमी कुत्र्याचा नागरिकांना होतोय त्रास

आजऱ्यात त्या जखमी कुत्र्याचा नागरिकांना होतोय त्रास

आजरा (हसन तकीलदार) :-आजऱ्यात डोक्याला गंभीर आणि मोठी जखम झालेल्या कुत्र्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या कुत्र्याला डोक्यावर एवढी खोलवर आणि गंभीर जखम झाली आहे कि हे दृश्य पाहणे किळसवाणे होत आहे. किडे पडलेल्या अवस्थेतील जखम घेऊन हा कुत्रा बिनदिक्कतपणे कोणाच्याही घरात घुसत आहे. त्यामुळे महिला आणि मुलांना हे दृश्य बघून जेवताना वगैरे त्रास होत आहे. जेवताना व इतर वेळी हे दृश्य डोळ्यासमोर आले कि बघ्यांचे जेवण बंद होत आहे. त्यामुळे या कुत्र्याचा नगरपंचायतीने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.

दर्गागल्ली, नाईक गल्ली, एस. टी. स्टॅन्ड, आंबोली रोड, कुंभार गल्ली, जिजामाता कॉलनी, हैदरनगर येथील घरांमध्ये हा कुत्रा घुसल्याने घरात दुर्गंधी पसरत आहे आणि महत्वाची बाब म्हणजे या कुत्र्याला काठीने हाकलण्याचा प्रयत्न जरी केला तर तो लवकर तेथून जात नाही असे लोकांचे म्हणणे आहे. भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी हैराण असलेल्या आजरवासियांना आता या जखमी अवस्थेत असलेल्या कुत्र्याचा सामना करावा लागत आहे. कोणतेही अनर्थ होण्याअगोदर या कुत्र्याचा बंदोबस्त करावा असे सामाजिक कर्यकर्ते आणि युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नौशादभाई बुडडेखान यांनी मागणी केली आहे.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿

तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

व्हाट्सअप चॅनेल लिंक

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

You Tube चॅनेल लिंक

https://youtube.com/@linkmarathi-news?si=Lxoia_I1Ft0OzJth

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular