WhatsApp New Update And Rules
व्हॉट्सॲप कायम नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या तयारीत असते . व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिक पसंती चे मेसेजिंग ॲप आहे. त्यामुळे अनेक लोक एकमेकापर्यंत पोहोचण्यासाठी व्हाट्सअप चा वापर करतात. काही नेते – उपनेते , सूक्ष्म मध्यम तसेच लघु उद्योजक , सगे सोयरे यांनी आपले विचार, मते , प्रोडक्ट तसेच इतर माहिती इतरांपर्यंत पोहण्यासाठी व्हॉटसॲप ग्रुप चा आधार घेतात. वेळोवेळी यामध्ये खूप प्रगती करत आहेत.
एका अहवालानुसार झिंबॉम्बे सरकारने सर्व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन यांना आता अँड टेलिकम्यूनिकेशन रेग्युलेटरी ऑफ झिम्बाब्वे ( Potraz ) मध्ये नोंदणी करावी लागेल तसेच ग्रुप चालवण्यासाठी लायसन्स लागेल. झिबॉम्बेचे संप्रेषण तंत्रज्ञान , पोस्टल आणि कुरिअर सेवा मंत्री ( ITTPCS ) ततंडा मवेटेरा यांनी ही घोषणा केली. परवान्यासाठी सुमारे ५० डॉलर म्हणजे ४२०० रुपये (भारत करन्सी नुसार ) लागतील .
व्हॉटसॲप ग्रुप च्या माध्यमातून चुकीच्या माहिती पसरवणे आणि संभाव्य अशांतता रोखणे तसेच देशाच्या डेटा संरक्षण हे उद्देश आहेत. व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सदस्याचा मोबाईल नंबर उघड होतो त्यामुळे ते डीपीए अंतर्गत येतात .
हा नियम भारत सरकार लावेल काय ? यांचे तर्क वितर्क भारतात होत आहेत. पण काही नेटकरी म्हणतात की आमचे सरकार हे होऊच नाही देणार कारण जर असे काही झाले तर देशातील तरुणांसाठीची बेरोजगारीची समस्या प्रखरतेने जाणवेल . आणि त्यांना फुकटचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मिळणार नाही. तरीही तुम्हाला काय वाटतं भारत देशात व्हॉट्सॲप ग्रुप बनवण्यासाठी पैसे मोजावे लागले तर काय होईल ?
मुख्यसंपादक