चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघात आजपर्यंत अनेक आमदार झाले, त्यांनी भागाचा विकास आणि प्रगतीच्या नावाखाली चंदगड मतदारसंघाच्या जनतेचीफक्त फसवणूक केली. नैसर्गिक आणि भौगोलिक सर्व संसाधने उपलब्ध असताना देखील मतदारसंघाला मागास ठेवण्याचं पाप केलं. त्यातून आपला चंदगड-आजरा- गडहिंग्लज भाग किमान ४० वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे हीच वेळ आहे बदल हवा तर आमदार नवा या संकल्पनेतून आमदार बदलण्याची, मानसिंग खोराटे यांच्या रूपाने नवा सक्षम पर्याय मिळाला असून त्यांना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत पठवूया असं आवाहन ॲड. संतोष मळविकर यांनी केले. तुडये मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मानसिंग खोराटे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पद यात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी जगन्नाथ हुलजी, सुनील नाडगौडा, नारायण तेजम, अनिल होडगे यांचेसह कामगार, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने पद यात्रेत सहभागी झाले होते.
- निरागस प्रेमाचं नाटक करून काही होत नाही…
आजपर्यंत केवळ प्रत्येक गोष्ट राजकारणासाठी केली. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना सगळीकडे केवळ मताचा गट्टा दिसतो. प्रत्येक समाजाला मतासाठी गोजारण्याचं कामं केलं आहे. आता निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी निरागस प्रेमाचं नाटक सुरू आहे. पण, कधी लोकांना जवळ केलं नाही. त्याला आता लोकचं मतदानातून उत्तर देतील असा चिमटा मळविकर यांनी नाव न घेता लोकप्रतिनिधींना काढला.
चौकट
भुल थापांना बळी पडू नका : जगन्नाथ हुलजी
सोळाशे कोटींची विकासकामं कुठे गेली हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या रंगरंगोटी, आमिष आणि भूलथापांना बळी पडू नका. नुसते रस्ते, गटारी करून विकास होत नाही. तेही रस्ते कुठं दिसत नाहीत. सोसायटी, डेअरी, संघ याच्या पलीकडे त्यांना कधी काही जमलंच नाही. दौलत साखर कारखाना सुरळीत सुरू करण्यासाठी कधी प्रयत्न केले नाही, उलट तो मानसिंग खोराटे यांनी चालवला नाही तर पळवला. त्यात खोडा घालायचं कामं या प्रस्तापितांनी कायमचं केलं. त्याचे हे प्रयत्न खोराटे यांनी हाणून पाडले. अशा या खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र राहणं गरजेचं असून खोराटे यांना प्रचंड मतांनी निवडून देऊया असं आवाहन जगन्नाथ हुलजी यांनी केलं.
मुख्यसंपादक