Homeक्राईमअपघात नाही त्या महिलेचा घातपात

अपघात नाही त्या महिलेचा घातपात

आजरा ( प्रतिनिधी )-: भादवण येथे उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह श्रीमती. आशाताई मारुती खुळे (वय ४२) रा. भादवन यांचा असून तो खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भादवन भादवणवाडी रस्तावर दीपक खुळे , आनंदा देवरकर यांच्या उसाच्या फडात गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान आग लागली. ती विझवण्यासाठी ग्रामस्थ गेले असता तिथं मृतदेह आढळला. सुरवातीला उसाच्या फडात जळाल्याने सदर महिला मृत झाली असे वाटत होते पण यामागे घातपात असू शकतो असा अंदाज व्यक्त होत होता. त्यामुळे तो फड पेटला की पेटवला असे नानाविध प्रश्न उपस्थित होते. गुरुवारी रात्री उशिरा ह्या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाली तरीही 24 तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील संशयित योगेश पाटील ट्रॅक्टर चालकाचे काम करतो (रा. भादवन ) यास ताब्यात घेतले. त्याच गावातील सुपुत्र संग्राम संभाजी कांबळे (सध्या कोल्हापूर पोलीस ) यांनी तपास कार्यासाठी विशेष प्रयत्न केले . खुळे यांनी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने गळा दाबून खून करून ऊस पेटवला असे तपासात पुढे येत असून श्वान पथक तैनात केले गेले. विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनी सुनील हरगुडे करीत आहेत.

याप्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थ चर्चेतून करत होते. तसेच सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

अश्या घटना घडू नयेत यासाठी तरुण मुला मुलींना योग्य वयात योग्य मार्गदर्शन तसेच काही प्रसंगी समुपदेशन देणे अत्यावश्यक आहे. ग्रामपातळीवर एक कमिटी नेमून तरुणाच्या मार्फत जनजागृती केली तर असे बळी पडणार नाहीत असे लिंक मराठी ला वाटते .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular