आजरा (अमित गुरव) :
लोकशाही पद्धतीने निवडणूक म्हटले की उमेदवारी अर्ज, प्रचार आणि मतदान ही तीन मुख्य पावले ओलांडावी लागतात. हीच प्रक्रिया प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी पी एम श्री आदर्श विद्या मंदिर, भादवण या शाळेने एक आगळीवेगळी शैक्षणिक उपक्रमाची आखणी केली आणि विद्यार्थ्यांसाठी ‘मुलांची लोकशाही निवडणूक’ राबवली.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार केला आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान झाले. 3 री ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत आपल्या लाडक्या उमेदवारांची निवड केली.
या निवडणुकीत पुढील विद्यार्थ्यांची बिनविरोध किंवा निवड झाली:
🔹 मुख्यमंत्री: कु. सृष्टी सागर गाडे (बिनविरोध)
🔹 विद्यार्थिनी प्रतिनिधी: कु. नमश्री सुनील जोशीलकर (बिनविरोध)
🔹 सांस्कृतिक मंत्री: कु. आराध्या सचिन देसाई
🔹 बागमंत्री: कु. आर्यन सचिन पाटील
🔹 सफाई मंत्री: कु. सई संजय दड्डेकर
🔹 आरोग्य मंत्री: कु. निषाद रविंद्र कुंभार
🔹 सहल मंत्री: कु. शंभु संजय केसरकर
🔹 क्रीडामंत्री: कु. आर्यन बाळासाहेब डोंगरे
🔹 प्रार्थना मंत्री: कु. आरोही काशिनाथ कुंभार
शाळेतील शिक्षक वृंदांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर आयोजन व देखरेख केली. विजयी उमेदवारांनी निवडून आल्यानंतर मंत्रीमंडळ स्थापन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेचे उत्तम प्रात्यक्षिक मिळाले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा आणि लोकशाही मूल्यांची बीजे रोवणारा ठरला.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️
*You Tube चॅनेल लिंक* 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
*व्हाट्सअँप चॅनेल लिंक* 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



