आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीचे निवडणूकीचे नगारे वाजल्याने आजऱ्याच्या राजकारणाचे तापमान वाढतच चालले आहे. इच्छुकांची भाऊगर्दी आणि युवाकांनी प्रस्थापिताना दिलेले आव्हान यामुळे घडामोडीना वेग येणार आहे. युवकांनी प्रस्थापिताना थेट आव्हान देत रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. 17 प्रभागात 9 महिला सदस्या असणार आहेत त्यामुळे महिलाराजचे वर्चस्व जरी असले तरी नगराध्यक्ष पद हे पुरुष खुले असल्याने अनेकजण यात इच्छुक दिसत आहेत. अनुसूचित जाती प्रवार्गासाठी 1,मागास प्रवार्गासाठी 3,सर्वसाधारण महिलासाठी 5,इतर प्रवार्गासाठी 2 तर 6 जागा खुल्या प्रवार्गासाठी आहेत. आणि नागराध्यक्ष पद खुले असल्याने यासाठी अनेकांच्या उड्या सुरु आहेत. नागराध्यक्ष पदासाठी सद्या अशोकआण्णा चराटी, अबूताहेर तकीलदार,संजयभाऊ सावंत, मंजूर मुजावर, संभाजी पाटील,अभिषेक शिंपी हे प्रामुख्याने इच्छुक आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोण कुणाला मिठी मारणार यावरही बरेच काही अवलंबून आहे.

मागच्या निवडणूकीमध्ये अशोकआण्णा चराटी यांनी आपल्या कन्येला नगराध्यक्ष पदावर विराजमान करण्यात यश संपादन केले होते. यावेळेस नगराध्यक्ष पद खुले असल्याने नागराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रस्थापिताना युवा पिढीकडून विरोध जरी होताना दिसत असला तरी बीजेपी कडून अशोकआण्णा चराटी तर काँग्रेसकडून त्यांना टक्कर देणारा प्रतिस्पर्धी देण्यासाठी चाचपणी सुरु आहे. सद्या अशोकअण्णांच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. विरोधकांच्या आघाडीत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारगट, शिंपी गट, मुस्लिम युवा गट त्याचप्रमाणे बीजेपीची जुनी नाराज मंडळी एकत्रित येण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे अशोकअण्णांची म्हणावी तितकी वाट सोपस्कर वाटत नाही. आजच्या घडीला अशोकअण्णांना कडवी टक्कर देणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून भगवा रक्षकचे संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ सावंत यांचे नाव कार्यकर्त्याकडून पुढे येताना दिसत आहे. जर मुस्लिम समाज एकत्र येत नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार दिला तर बाजू पलटू शकते. आजच्या घडीला अबूताहेर तकीलदार हे मुस्लिम समाजातून इच्छुक असून त्यांनी मागील महिन्यापासूनच आपली फिल्डिंग लावायचे काम सुरु करून वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी घेण्याचे काम सुरु केले आहे. परंतु मुस्लिम समाजातूनही अनेकजण इच्छुक असल्यामुळे त्यांनाही तेवढे सोपस्कर दिसत नाही. एकंदरीत या नगरपंचायतिमध्ये अनपेक्षित घडमोडी घडणार हे नक्की.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक



