राज्यात पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावं – हवामान विभागाचा अलर्ट
मुंबई :
राज्यभरात आगामी पाच दिवसांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांत गडगडाटी वादळ, वीजांचा प्रचंड लखलखाट आणि मुसळधार सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणते भाग होतील प्रभावित?
मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सूचना
पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाची उपाययोजना करावी, तसेच कोरडवाहू पिकांची निगा राखावी, अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटामुळे पशुधन व उपकरणांचे संरक्षण करणेही अत्यंत आवश्यक आहे.
शालेय व नागरी प्रशासन सज्ज
स्थानिक शाळा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महानगरपालिका यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी आवश्यक असल्यास सुट्ट्या जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवामान विभागाचे आवाहन
“गडगडाटी वादळ, विजा आणि जोरदार वारे यांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी शक्यतो घरात राहावे, विजेच्या खांबांपासून, झाडांपासून दूर राहावे, मोबाईल फोन वापरण्यापासून टाळावे,” असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
लिंक मराठी टीम
लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .
*Follow Us*

मुख्यसंपादक