आजरा (हसन तकीलदार ):-वाढदिवस म्हटले कि फटाके गुलाल, केक, गोंधळ, डी जे, पार्ट्या असे चित्र डोळ्यासमोर येते परंतु वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याचे संचालक राजेश जोशीलकर यांनी या सर्व बाबींना फाटा देत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.

उद्योजक जोशीलकर हे साखर कारखान्याचे संचालकही आहेत. भादवण येथील केदारलिंग दूध व्याव. सह. संस्थेमध्ये यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने भागातील शेतकऱ्यांना काजुची रोपे वितरीत करण्यात आली. निसर्गाचा होत असलेला ऱ्हास आणि वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल यामुळे ऋतुमानाचे चक्र बिघडत चालले आहे. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर “झाडे लावा, झाडे जगवा “या घोषवाक्याचे तंतोतंत आचरण करणे काळाची गरज बनली आहे. म्हणून वृक्षसंवर्धनाबरोबर शेतकऱ्यांना नगदी पीक देणारे काजूचे झाड उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने जोशीलकर यांनी जवळ जवळ 150 काजुची झाडे शेतकऱ्यांना वाटप केली त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी रणजित गाडे, मुळीक गुरुजी, अर्जुन दोरूगडे, सदाशिव पाटील, रघुनाथ पोवार, अंकुश खवरे, स्वप्नील शिंदे, अक्षय जोशीलकर, धनाजी गुरव, विकास जाधव, ज्ञानेश्वर केसरकर, आदिजण उपस्थित होते.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक