Homeघडामोडीभादवण मध्ये शिवसेना वतीने कार्यकर्त्यांची तातडीची बैठक पण नेमक कारण काय..?

भादवण मध्ये शिवसेना वतीने कार्यकर्त्यांची तातडीची बैठक पण नेमक कारण काय..?

अमित गुरव ( भादवण) – भादवण मध्ये शिवसेना गटनेते संजय पाटील यांनी तातडीने बैठक आयोजित केली असल्याचे समजते. पण ही बैठक नेमकी कश्यासाठी लावली आहे याची खात्रीशीर बातमी समजली नाही.
असे असले तरी ही बैठक यात्रा निम्मित नसल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात होत होती.
यात्रा तोंडावर असताना कोणता राजकीय स्फोट होणार काय ? आणि जर झालाच तर पुढे आपण आपले राजकीय भविष्य कोणासोबत सुरक्षित राहील ? असे नानाविध प्रश्न कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.


भादवण मध्ये होणारी ही बैठक मुंबई पर्यंत पोहचली तर आहे पण विषय काय असणार ? भविष्यात काय होणार ? आणि यात्रा नक्कीच कशी गाजणार अश्या विविध चर्चा फोन वर रंगत आहेत.
राजकीय स्फोट झालाच तर विरोधकांची नेमकी काय भूमिका असणार हे येणाऱ्या काळात महत्वाची बाजू ठरेल .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular