Homeघडामोडीगव्याच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

गव्याच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

आजरा – आंबोली मार्गावर सुळेरान ते घाटकरवाडीच्या ३१ मार्च रोजी गव्याने दुचाकी स्वारांवर केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील अजित मारुती कांबळे (वय २७रा. हात्तीवडे) व सागर धोंडीबा कांबळे (वय २८ राहणार हात्तीवडे, ता. आजरा) हे दोघे जखमी झाले होते . यांपैकी अजित कांबळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा आज रविवारी मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी …

अजित मारुती कांबळे व सागर धोंडीबा कांबळे हे पणजी गोवा येथे कामाला असून पाडवा सणानिमित्त गावी हात्तीवडे येथे येथे आले होते. सण आटोपून कामावर लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने ते सोमवारी पहाटे दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने जात असताना अचानकपणे रस्त्यावर आलेल्या गव्याने त्यांच्य दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये दोघेही दुचाकीवरून बाजूला फेकले गेले.

अजित कांबळे हा गंभीर जखमी झाला होता. सागर हा देखील जखमी होता. दोघांनाही गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अजित याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

उपचारा दरम्यानच त्याचा आज दुपारी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular