Homeघडामोडीपैसा माणसाला कसा नाचवतो आणि कोणत्या टोकाला घेऊन जाते हे लकी भास्कर...

पैसा माणसाला कसा नाचवतो आणि कोणत्या टोकाला घेऊन जाते हे लकी भास्कर चित्रपटातून पहा

spoileralert

पैशांची नशा माणसाला कसं नाचवतो आणि हे व्यसन कोणत्या टोकाला घेऊन जातं आणि काय काय उद्ध्वस्त करतं हे सांगणारा नेटफ्लिक्सवर ताजा ताजा असलेला “लकी भास्कर” चित्रपट!

चित्रपटाच्या सुरूवातीच्याच काळात मुख्य पात्राचा मित्र एकदम ठसकेबाज डायलॉग मारतो, “डाउन पेमेंट के सपनों से पहले हकिकत का कर्जा तो चुका दे यार…”
यावरून मुख्य पात्राची गरिबी अधोरेखित होते. पण काय खत्री डायलॉग आहे. जिथे स्कैम किंवा घोटाळे झालेत असे सिनेमे पाहायला जास्त आकर्षक वाटतात. ते लवकर ब्लॉकबस्टर होतात. कारण त्यांची सुरुवात ९० टक्के गरिबीतून झालेली असते. मेहनत करूनही फळ न देणारी, मार्ग न दाखवणारी गरिबी!
या चित्रपटातही एक असा भास्कर नावाचा गरीब कॅशियर आहे. बँकेतला कॅशियर, शेअर मार्केटचा बाप दी हर्षद मेहता आणि पैशासाठी विकलेला इमान यावर आधारलेला हा सिनेमा! सिनेमात जो जुन्या काळातील माहोल दाखवला आहे त्याने सिनेमाला वेगळा टच येतो. आपण त्या कथेशी एंगेज होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वातावरण निर्मिती आणि त्या पैलूवर चित्रपट जिंकतो.
मध्यांतरानंतर भास्कर पैसे कमवण्याच्या एका अशा टप्प्यावर पोहोचतो जिथून त्याचं मागे परतणं कधीच शक्य झाले नसते. पण त्यादिवशी टॉपचे CA असलेले भास्करचे वडील म्हणतात, ये सब तुमने फ़ैमिली के लिए किया था| शुरुवात फ़ैमिली के लिए ही होती हैं और फिर इसमें इतने आगे निकल जाते हैं की उन्हें ही भूल जाते हैं ।
चित्रपट एका प्रमाणिक कैशियरच्या आम आयुष्यापासून सुरू होतो. ३०-३५ च्या घरात असलेला हा भास्कर त्या प्रत्येक पुरुषाचे व्यक्तिमत्व दाखवतो जो आपल्या घरासाठी जिवाचे रान करत असतो. पण क्षमता असूनही बँकेतल्या पॉलिटिक्समुळे त्याला प्रमोशन मिळत नाही आणि जबाबदाऱ्या मात्र कमी झालेल्या नसतात. तेव्हा हमखास पटतं की, “पैसा देव नाहीये पण देवापेक्षा कमीही नाहीये.”
भास्कर जेव्हा या गरिबीच्या पराकोटीला पोहोचतो तेव्हा अखेर त्याच्या प्रामाणिकपणाला डावलून तो बँकेतून २ लाखाची चोरी करतो. बँकेत कामाला असलेल्या भास्करसाठी ही चोरी करून चोरी न केल्याचं भासवणं सोप होतं. कारण बँक बंद करताना उचललेले पैसे बँक उघडण्याआधीच आहे त्या ठिकाणी ठेवणं त्याच्यासाठी सोप असतं. पण त्या चोरीतून काय साध्य होईल हे मात्र गुलदस्त्यात होतं. ते इथे लिहिण्यात अर्थ नाही. चित्रपट तितका छाप सोडत नाही जेवढा प्रभाव स्कॅम १९९२ ही सिरीज सोडते. अर्थात विषय वेगळे आहेत मात्र तरीही हा चित्रपट नक्कीच फ्रेश कंटेंट देतो. आवडतो!

सुमती, मुख्य पात्राची बायको म्हणते, पैसे असेल तर आदर आणि प्रेम दोन्ही मिळते. बायकोला व्यावहारिक सजगता असणं गरजेचं आहे आणि ती त्यामुळेच भास्करसोबत लग्न करण्याबाबत आत्मविश्वासू असते, हे हळूहळू पटते.

खरतर अशा फसवणुकीच्या कहाण्या भारी थ्रिलिंग असतात. त्यातले बरेच मार्ग आपल्याला माहीत असतात पण रिस्क मोठी असते. शॉर्टकट मारून प्रमाणिकपणा विकून जास्त पैसे मिळवण्याचे मार्ग कित्येकदा आपल्यासमोर येतात. मात्र तिथे आपण त्या रिस्क न घेण्याची कारणेही चित्रपट सांगतो.

अनेक फिल्ममध्ये दाखवले जाते की खुपवेळा यशस्वी झालेले लोक त्या शेवटच्या एका रिस्कमुळे अडचणीत येतात. कारण योग्य वेळी थांबणं गरजेचं असतं. पण पैशाच्या मोहात वेळेचं भान राहत नाही. अशा वयात घरातल्या मोठ्यांनी सबुरीने समजावले तर काय बदलू शकतं याचा एक सिन चित्रपटात आहे. जेव्हा भास्करचे वडील त्याच्या या इलीगल व्यवहार पाहून अखेर त्याच्याशी ४ भिंतीआड बोलायचं ठरवता आणि त्यातही अजिबात अरेरावी न करता शांतपणे समजावतात. तेव्हा वाटते वयात आल्यानंतर खरतर बापाचा रोल मुलाच्या आयुष्यात महत्वाचा असतो. आपल्या अनुभवांतून मुलाला शहाणं करणाऱ्या बापाची मुले कमी चुकत असावी. कॉमन मिडल क्लास इंडियन मॅनची स्टोरी हळूहळू भास्करला करोडपती होऊन सोडते.

खरतर जुगाराच्या खेळात कधीच एकजण बाप नसतो. प्रत्येकवेळी इथला बाप बदलत असतो. तसंच हर्षद मेहताचा बाप निघाला हा भास्कर… सगळा गफला करून अखेर सातासमुद्रपल्याड निघून गेला. अर्थात भास्करने कमावलेल्या पैशाने हर्षद मेहताला फरक पडला नव्हता. पण या व्यसनातून पूर्ण सुटका करून गुन्हाही पकडून कसा द्यायचा याचा प्लॅन भास्करने अचूक कृतीत उतरवला. या नशेच्या समुद्रात अडकलेला हा मासा सफाईने बाहेर पडला. शेवटच्या काही मिनिटात चित्रपट अनेक गोष्टी रिव्हील करतो. अनेक कथांचे संबंध जोडतो. तिथे आपण या चित्रपटाला जोडले जातो.
बऱ्याच चित्रपटांत शेवटचा एक रिस्की चान्स घेतल्यामुळे मुख्य पात्र पकडले जातात. पण भास्कर सुटतो. कारण कदाचित त्याला केव्हा थांबायचे हे कळलं किंवा त्याच्या आपल्या लोकांचं त्याला समजावणं त्याने ऐकलं.
अशा सिनेमांबद्दल प्रेक्षक वर्गाला थोडी सहानुभूती असते कारण यात अशा अनैतिक, बेकायदेशीर गुन्ह्यांना असलेली पार्श्वभूमी त्यांना माहीत असते. त्याची लिंक लावताना तो गुन्हा पूर्णतः चुकीचा म्हणून पाहिला जात नाही. त्यामुळे असे चित्रपट जास्त चालतात.

  • संकलन – लिंक मराठी
  • साभार – सो. मि

Lucky Baskhar

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular