चंदगड -: आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन मांडेदुर्ग ता- चंदगड येथील खेळाडूंचे शाहू साखर कारखाना तर्फे घेण्यात येणाऱ्या मानधन धारक कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल उद्योजक मानसिंग खोराटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन देऊन गौरवण्यात आले. मांडेदुर्ग गावाला कुस्तीचा वारसा लाभला आहे या गावातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन कुस्तीपटू तयार झालेले आहेत आणि नंतर आदर्श डोळ्यासमोर ठेवून या नवयुवकांनी सुद्धा आपल्या गावाचा नावलौकिक वाढवावा यासाठी दौलत अथर्व प्रशासनाकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
१) पैलवान सत्याजित संकपाल ज्युनिअर ६०किलो कास्या पदक २) पैलवान श्रेयश कपले ओपन गट कस्या पदक ३) पैलवान शंभुराजे कपले ३२किलो सहभाग ४) पैलवान सूरज राजेंद्र नौकुडकर पाच किलोमिटर धावणे कास्य पदक
यावेळी ग्रा. सदस्य तानाजी पाटील , सुरेश पाटील , प्रमोद दोरुगडे, तानाजी चोपडे, निगाप्पा पाटील , एकनाथ पाटील, माजी सरपंच तेऊरवाडी बापूसाहेब शिरगावकर कोरज उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लाड यांनी मानले.
मुख्यसंपादक