Homeबिझनेसदैनंदिन ठेव / पिग्मी सुरू करावी का ?

दैनंदिन ठेव / पिग्मी सुरू करावी का ?

थेंबे थेंबे तळे साचे अशी आपल्याकडे सर्वश्रुत एक म्हण आहे. पिग्मी खातेदार त्यांच्या खात्यात आपल्या परीने कितीही रक्कम दररोज भरू शकतो याला पिग्मी / दैनंदिन ठेव असे म्हणतात. या योजनेचा सर्वोत्तम फायदा म्हणजे ज्या- त्या पतपेठीचा अधिकृत प्रतिनिधी खातेदाराच्या व्यवसाय ठिकाणी जाऊन रोजच्या रोज पैसे जमा करतो व बँकेत भरतो त्यामुळे व्यावसायिकाचा वेळ वाचण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत मिळते.
वेळोवेळी झालेल्या टेक्निकल बदलात सध्या मोबाईलचा वापर करून ठेव संकलन करण्यात येते ज्यामुळे विश्वास वाढतो आणि काम जलद गतीने होते. छोट्यामोठ्या उद्योजकांना बचतीची सवय लागते त्यामुळे त्याची भविष्यातील एकादी मोठी गरज ( लग्न , घर खरेदी , वाहन खरेदी , व्यवसाय वाढ , आकस्मिक दवाखाना खर्च इ , ) भागवता येते .
ज्या – त्या पतसंस्था नियमाप्रमाणे द. सा. द . से व्याजदर मिळते पण त्यांच्या नियम व अटी लागू करण्यात आल्या असतात.
आपण पिग्मी भरताना त्या संस्थेची पाश्वभूमी तपासावी जेणेकरून भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही.

  • अमित अशोक गुरव – 8421666667

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular