Homeमुक्त- व्यासपीठअंधश्रद्धा

अंधश्रद्धा

घराच्या उबरठ्यावर लिंबू मिरच्या बांधले ,
कोंबड्या अन् बकऱ्याचा बळी पण दिले ,
कपाळी गंध थापलेल्या भगव्या कपड्यांतल्या बाबांकडे सुद्धा गेले ,
पण साडेसातीच्या फेऱ्यातून काही बाहेर नाही आले ,

पूजा विधी उपासतापास नवसही करून झाले,
दानधर्म करता करता खिसे रिकामे करून झाले,
ग्रह ताऱ्यांच्या शांतीसाठी हातात गळ्यात माळा घालून झाले ,
घराच्या शुद्धीकरणासाठी बुवा
लोकांच्या झोळ्या सुद्धा भरून झाले ,
पण साडेसातीच्या फेऱ्यातून काही बाहेर नाही आले ,

मांजर आडवी गेली म्हणून काम नाही झाले,
अपशकुनी चे तोंड पाहिले म्हणून सगळे अडले,
उपासतापास नाही जमले म्हणून सुखी नाही राहिले,
हेच गृहीत धरले म्हणून सगळे करूनही पाहिले,
पण साडेसातीच्या फेऱ्यातून काही बाहेर नाही आले ,

बकऱ्या आणि कोंबड्यांचे बळी पण दिले,
बाबांकडे जाऊन लोटांगण घातले,
देवाला प्रसन्न करण्यासाठी जिवाचे रान केले,
दगडांमध्ये पण देवाचे अस्तित्व मानून त्याला पुजले,
पण साडेसातीच्या फेऱ्यातून काही बाहेर नाही आले ,

सगळे करून अगदी थकून गेले,
देवानेच मग साक्षात स्वप्नात दर्शन दिले,
जे माझे आहेत तेच मला देऊन का खुश केलेस,
थोडे कष्ट घे शरीराने मग बघ
पाहिलेले सगळे स्वप्न पूर्ण असेल झालेले,
पटकन डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहिले,
तिकडे कोणीच नव्हते
परमेश्वराने स्वत: मार्ग दाखवले,
हो आता मात्र मी साडेसातीच्या फेर्‍यातून सुटले…

कवयित्री- नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular