पुणे (प्रतिनिधी ) -: पुणे महापालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा चा ऑनलाईन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महापौर यांनी दिली होती.
दोन्ही दिगग्ज नेते उपस्थित राहणार त्यामुळे राजकीय फटाकेबाजी अनुभवण्यासाठी म्हणून त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी भाजप च्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम च्या घोषणा देण्यास सुरुवात केली ; याला प्रतिउत्तर म्हणून एकच वादा अजितदादा ह्या घोषणाबाजी ने राष्ट्रवादी च्या कार्यकर्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे थोडा तणाव व गोंधळ झाला पण पोलिसांच्या मध्यस्थीने सर्व शांत होऊन पुन्हा कार्यक्रम सुरू झाला .
भामा आसखेड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद चालूच होता याच कारणास्तव कार्यकर्ते भिडले असावेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पण अद्याप ठोस कारण पुठे आले नाही .
एकूणच महाराष्ट्रातील राजकारण झालेल्या उलथापालथीनंतर पहिल्या भेटीवेळी हास्यविनोद , दुसऱ्या राजकीय फटकेबाजी आणि तिसऱ्या प्रत्यक्ष भेटीवेळी कार्यकर्ते एकमेकांना भिडणे असा क्रम पवार आणि फडणवीस यांच्यात घडला .
मुख्यसंपादक