Homeआरोग्यप्रेग्नसी मध्ये संभोग बाळाला हानी पोहचवतो का ?

प्रेग्नसी मध्ये संभोग बाळाला हानी पोहचवतो का ?

अबब या विद्यार्थ्यांने २ मिनिटं ३७ मध्ये २०० व्हायरस ची नावे सांगून जागतिक विक्रम केला .

सुमित चे लग्न होऊन साधारण ५-७ महिने झाले होते. घरातील सर्वांनाच नवीन पाहुण्या ची चाहूल कधी लागेल याची प्रतीक्षा होती. आणि आज सकाळी अचानक ही गोड बातमी एकादशी दिवशी मिळाल्याने हे माळकरी कुटुंब स्वर्ग सुख मिळाल्याच्या आनंदात व्यापले होते. बातमी पावणे मंडळी च्या प्रयत्न पण धडकली आणि मग सुरू झालं फोन वरून अभिनंदनाचा वर्षाव आणि त्यासोबतच सल्ले व उपदेश . पायऱ्या चढू नये, पोहायला जाऊ नये, आणि सेक्स तर अजिबात नाही . त्यात बाळ गोरेच झाले पाहिजे असा सल्ला जवळजवळ सर्वांचा आणि त्यावर हुकमी उपाय म्हणून दुधात केसर घालून पिणे . पहिला-पहिला तर स्वाती हे आनंदाने स्वीकारत होती पण आता मात्र तिला उठसुठ मिळणाऱ्या या मोफत सल्लाचा त्रास होऊन चिडचिड होऊ लागली. पण तिच्या आईने तिला समजावले की तुला सल्ला देणारे तुझ्यावर प्रेम करणारेच लोक आहेत ते तुझ्या काळजी आणि प्रेमापोटी सांगत आहेत. ती शांत तर झाली पण अस्वस्थ होती त्यामुळे आपली बैचणी दूर करण्यासाठी तिने याची परिपूर्ण माहिती घेण्याचा निर्णय घेतला आणि तज्ञांचे मत जाणून घेतले . आणि त्यावेळी …
आपले शरीर अरबो छोट्या-छोट्या कोषकांनी (cells ) ने बनलेले आहे. हे कोषक आपल्या-आपल्यात मिळून ऊतक ( Tissues ) बनतात ,ऊतक ( Tissues)
आपापसात मिळून ऑर्गन (Organs systems ) तयार होतात ; जसे की डायजँस्टिक स्टिस्टम रिप्रोडक्टटिव्ह सिस्टम ….
मानवी शरीरात सर्वात लहान कोषक शुक्राणू तर सर्वात मोठे ओवम / एग (egg ) हे आहे. शुक्राणू ( sperm ) खूप छोटे असतात पण एका मिनिटांत आपल्या आकाराच्या किती तरी जास्त प्रवास करतात. इजाक्युशन व्दारा एक अरब पेक्षा जास्त शुक्राणू (Sperm ) निघतात पण जो सर्वात प्रथम अंड्यापर्यन्त पोहचतो तो गर्भधारणा (Fertilization) करू शकतो. गर्भधारणा (Fertilization)
च्या ३० तासानंतर एग (Egg ) एक-दोन कोषक बनतात , मग काही वेळाने एकाचे- दोन , दोनाचे- चार , चाराचे -आठ , आठचे -सोळा कोषक बनतात. याला तीन दिवसांचा कालावधी लागतो. हे तोपर्यंत चालते जोपर्यंत गर्भधारणा होत नाही . जेव्हा युटरस च्या लाईनवर युटरस चा Egg लागतो तेव्हा मासिक पाळी येण्याचे थांबते.
गरोदरपणात महिलांच्या शरीरात जे आमूलाग्र बदल होतात ते चमत्कारिकच म्हणावे लागेल. पोटात जस जसे बाळ वाढते तस -तसे गर्भाशयाचा आकार पण वाढतो. प्रेग्नन्सी च्या आधी गर्भाशय ६० ग्रॅम पेक्षा लहान असतो. शुक्राणू ( sperm )अंड्याबरोबर फलटीलायझर होण्यासाठी Cervix हा खालचा भाग खूप महत्वाची भूमिका बजावतो. Cervix हा Cervix Mucus सोडतो जेणे करून शुक्राणू हा अंड्यापर्यत सुरक्षित पोहचतो. ह्याच दरम्यान Progestrone आणि Estogen हॉर्मोन्स निघतात. जे युटरसच्या लायनींग ला जाड बनवतात. ज्यामुळे गर्भधारण तिथे सुरक्षित टिकू शकतील. पुढील १२ आठवड्यात (३ महिने ) प्लसेंटा (Placenta ) बनते जी गर्भाशयात बाळाची काळजी घेते. प्लसेंटा गर्भनाळच्या साह्याने बाळाच्या जरुरी पोषण पोहचवते. बाळाच्या जन्मवेळी प्लसेंटा चे वजन साधारण ७०० ग्रॅम असते. फलटीराईज झालेले अंडे गर्भाशयाला मिळते तेव्हा गर्भाशयाचा ( युटिलिटीज) चा आकार वाठायला लागतो. Estrogen हॉर्मोन्स गर्भाशय वाढण्यास मदत करतो , त्यामुळे बाळाला जागेची कमी होणार नाही. हा तोच युटरस जो फक्त ६० ग्रॅम चा होता तो ९ महिन्यांनी २ फुटबॉल प्रमाणे मोठा होतो. म्हणजेच साधारण पहिल्यापेक्षा २० पटीने जास्त . युटरस की मासपेशीया आखडतात म्हणजेच आकुंचन (Contraction) होते . तेव्हा Contraction
मुळे बाळ सुरक्षित बाहेर येते त्यावेळी प्रसूती कळा जाणवतात. बाळाचा जन्म झाल्यावर युट्ररस आपल्या खऱ्या आकारात येण्यासाठी ६ आठवडे लागू शकतात. तेव्हा ही प्रत्येक दिवशी १ सेमी प्रयन्त कमी होते. या ६ आठवड्याच्या दरम्यान कायम रक्त पडते.म्हणजेच प्रेग्नन्सी झाल्यावरही शरीर काम करते. त्यामुळेच प्रेग्नन्सी च्या वेळी आणि नंतरही काही दिवस आपली काळजी घ्यावी लागते.

प्रेग्नसीचे पहिले १२ आठवडे सर्वात महत्त्वाचे असतात. कारण यादरम्यान कोषक गुणकारांच्या संख्येत वाढतात. आणि याच दरम्यान मिस कॅरेज ( गर्भ दगावण्याचे ) चान्स असतात. म्हणून सांभाळून चला , जास्त दगदग करायची नाही असे सांगितले जाते . पहिल्या स्टेज ला महिलांना जास्त झोप येणे , हामोर्न्स खालीवर झाल्याने खकवा जाणवणे हे प्रकार होतात. जर आपल्या सोबतही असे होत असेल तर झोपा . तुमच्या शरीराचे ऐका आणि आराम करा. पण तुम्ही स्वतःला तंदुरुस्त (fit and fine) समजत असाल तर दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तसे करू नका.

दुसऱ्या स्टेज ला म्हणजे ४ ते ६ महिना सर्वात सोपा मानला जातो त्यामुळे , त्यावेळी तुम्ही योग , व्यायाम, किंवा पोहणे हे करू शकता. पण तेच करा ज्याची तुमच्या शरीराला सवय आहे नवीन काहीतरी वेगळे करू नका. यादरम्यान पौष्टीक खाणे-पिणे करावे पण एकाच माणसाचे ; कारण बाळाचे पोट जेव्हा ते जन्म घेते तेव्हा १ मटार पेक्षा पण लहान असते . मग ते गर्भाशयात असताना किती लहान असेल विचार करा. दुधाला संपूर्ण आहार मानले जाते ; पण काही-काही महिलांना दुधाची अँलर्जी असते त्यामुळे त्यांना ऍसिडिटी होते. तेव्हा त्यांनी आपल्यासोबत जबरदस्ती करू नये . नारळपाणी पिल्याने ऍसिडिटी पासून बचाव होतो त्यामुळे ते फायदेशीर ठरते. केसर मध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidant) असते म्हणून ते दुधातून घेतात. मी हे नवीन काहीतरी शिकले किंवा मला समजले हे ती आपला पती सुमित ला सांगण्यासाठी ऑफिस मधून येण्याची त्याची वाट पाहत होती . तिने हे सगळे सांगितले .
…आणि मग सुमित ला ही प्रश्न उपस्थित झाला की प्रेग्नसी मध्ये संभोग करण्यामुळे बाळाला इजा पोहचू शकते ? त्याने हा विचार टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण रात्रभर तो तळमळत होता तो प्रश्न त्याला सतावत होता . पहाटे पहाटे मी याचा अभ्यास करेन यांचा निर्धार त्यांने केला . पण ऑफिसमध्ये कोणाजवळ ह्याबद्दल बोलावे आणि त्याचा परिणाम काय होईल या विचाराने तो थांबला पण डोक्यातून तो विचार काढू नाही शकला . शेवटी त्यांनी युक्ती शोधून त्यावर टिप्पणी लिहायला सुरुवात केली तेव्हा , तसे काही नसते कारण Penetration हे vagina ( योनी ) मध्ये होते व बाळ Uterus मध्ये असते . आणि यामध्ये Cervix की लेअर होते. त्यामुळे बाळापर्यत पोहचताच नाही . अशी माहिती त्याला मिळाली तेव्हा त्याचे विचलित मन शांत झाले. पण लोकांच्या अजूनही बऱ्याच शंका असतात त्यात अजूनही एक गैरसमज आहे की , प्रेग्नसी मध्ये संभोग करण्यामुळे बाळाला इजा पोहचू शकते ? तर तसे नसते कारण Penetration Vagina मध्ये होते व बाळ Uterus मध्ये असते. आणि यामध्ये Cervix की लेअर असते त्यामुळे बाळापर्यत पोहचताच नाही. हो फक्त प्रेग्नसी मध्ये अडचणी असतील आणि डॉक्टरांनी असे करायला नको सांगितले असेल तर डॉक्टरांचे जरूर ऐकावे. प्रेग्नेंसी मध्ये आपल्या शरीराचे व डॉक्टरांचे म्हणणे जरूर ऐकावे.

संकलन –

अमित गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular