Homeमुक्त- व्यासपीठअगणित अस्तित्वांचा बलात्कार

अगणित अस्तित्वांचा बलात्कार

वाचून कळलच असेल आज नक्की काय विषय असणार आहे , हो आज खूप च कळीचा विषय आहे….

रोज आणि रोज वर्तमान पत्रावर वर अगदी ठळकपणे नमूद केले गेलेले बलात्काराचे हृदयाला भेदून टाकणाऱ्या बातम्या….
अश्या बातम्यांची ची शिर्षकच पाहिलं की अंगावर काटा येतो …

मला बोलायचं आहे..
आपल्या लहानपणा पासून आपल्या शाळे पासून..शिक्षकांनी दिलेल्या या प्रतिज्ञा पासून….

भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे .
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन .
मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा णि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे
जय हिंद….

म्हटल खूप दिवसांनी सर्वानच्याच डोळ्याखालुन प्रतिज्ञा…घालावी.

लहानपणापासून आपण शालेय जीवन संपे पर्यंत शाळेत आपली अशी प्रार्थना घेतली जायची…..जशी पंतप्रधान, राष्ट्रपती, सैनिक, पोलिस, आणि इतर यांनाही आपल्या कार्य पद्धती सुरू करण्यापूर्वी प्रतिज्ञा घेतली जाते

थोरा मोठ्यांचे पोवाडे गायले जायचे….
छत्रपती महाराजांचे धडे शिकवले जायचे…
शाळेच्या भिंतीवरचे सुविचार…
१. माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
२.आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागवू नका
३.काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असते
४.मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते
५.संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे

आपण लहान पणापासून एक संस्कार अंगी बाळगून असतो….आता प्रत्येकालाच काही शाळेत जाऊन शिक्षण मिळत अश्यातला काही भाग नाही , बिना शिक्षणाची पणं भरपूर जण आहेत…पणं त्या बिना शिकलेल्या माणसांना चूक काय आणि बरोबर काय इतकं न कळाव इतकी तर त्या व्यक्तीना समज असतेच….

पूर्वी च्या काळात आपल्या आजोबा पणजोबा च्या कोणत्या काळात कुणाकडे इतकी श्रीमंती होती आणि शाळा होती की ते लोक शाळेत शिकून आलेत….चांगले गुण शिकण्यासाठी शाळेत जाव लागत नाही बालपणापासून आई बाबा संस्कार करत असतात

ज्योतिबा महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले हे दोघे थोर व्यक्ती होते म्हणून आज प्रतेक स्त्री शिकू शकली , स्वप्न पाहू शकली,

नाहीतर पूर्वी बालपणातील लग्न आणि त्यांचे संसार….

अशी कोणतीही घटना तुम्हाला माहीत नसेल बलात्काराची जी बातम्यांच्या मुख्य, मधल्या, शेवटच्या पेजवर आढळत नसेल…

महाभारत पासून चालू झालेल्या या गोष्टी श्री कृष्णाने संपवल्या तरी ही अजून ही दुर्योधन जन्माला येतातच, मग ते काही आईच्या पोटातून येतात अस नाहीय
मग अस काय होत की जेणेकरून बलात्काराच्या या गोष्टी घडतात..च..

बघू पुढे काय म्हणायचं आहे मला
प्रत्येकाने आजवर बलात्काराच्या बातम्या आणि घटना ऐकल्या आहेत, यात मग चिमुरड्या मुली पासून कोणत्याही वयातली स्त्री असो, मध्यंतरी सावधान इंडिया मध्ये दाखवलं आहे यात तर चिमुरड्या मुलांनच्या बाबतीत सुद्धा हेच ऐकायला मिळत
निर्लजपणान माखून टाकल य हे सगळे दुष्कृत्य..

म्हणजे समजत नाही की “स्त्री” ही अतुल्य, अमूल्य आणि मौल्यवान अशी देणगी दिलेली आहे धरत्रिवर तिचा असा अपमान,
जी जन्मल्यापासून दुसऱ्यांसाठी जगते, प्रतेक स्तरावर आपल कर्तव्य बजावते, ९ महिने आपल्या उदरात पुरुष असो या स्त्री तिला ठेऊन ती जन्म देते याचा काहीच अर्थ नाहीय का ?

पुरातन काळापासून स्त्री ला देत आलेला दुय्यम तेच स्थान हे नेहमीच पाहायला मिळालं , तिने मध्ये बोलू नये, अस करू नये, तस करू नये, हे घालू नये, ते घालू नये…ते शिकू नये ….
त्याने काय होणार करायचं आहे ते फक्त चूल आणि मुलच ना….इथेच सर्व स्टॉप……

आज ही इतकी स्त्री पुढे गेली असली तरी समाजात तेच चालू आहे…असमानता अजूनही आहे…

एक स्त्री मुलगी पासून सुरू होते आजी पर्यंत संपते, तिचा कालावधी पाहिला आणि कर्तव्य पाहिली तर अभिमान होईल अस तीच जगणं अस्त..

शाळेत आपण सरस्वती ला, धनासाठी लक्ष्मीला, नवरात्री ला देवीला पुजतो अगणित रूप आहेत तिची आणि तेच रूप म्हणजे “स्त्री” आहे

हे झालं मुलींचं एक स्त्री च अस्तित्व,…

आणि एक पुरुष..
जबाबदारी पूर्वक वागणं लहानपणापासून शाळेत अव्वल येऊन कुठेतरी नोकरी पाहण, आई बाबांचा सांभाळ करन, कुठेतरी आपल्या इच्छा मारून घरच्यांना सुख देण्यात प्राधान्य देन, कुठे देशासाठी शहीद होतात, नोकरी साठी तेही वन वन फिरत असतात… मूली सारखं त्यांना ही नोकरी साठी कुठे ना कुठे तरी दूर राहावं लागत, आपल जेवण आणि बाकीची काम करण्याची कला पुरुषांना पणं आहे .

..तोही मुलगा पासून आजोबा पर्यंत आपल्या जबाबदाऱ्या अगदी मनापासून पार पाडत असतो…

आता येऊयात मूळ मुद्द्यावर
“बलात्कार “
हा शब्द ऐकताच एक घृणास्पद विचार डोक्यात सुन्न करून जातो….
आज एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार ..
आज एका तरुण मुलीचा बलात्कार…
बलात्कार करून खून ,
नदीत फेकल, समुद्रात फेकल, तळ्यात फेकल, आणि त्या बातम्यांच्या शीर्षकात दुसरे तिसरे तर सोडून च द्या ज्या व्यक्तीचा खून केला जातो त्याचे च कोणी तरी जवळच अस्त बोलतात ना याहून नीच म्हणजे नीच काही नसेल ….

काही मिनिटांच्या आपल्या वासणेसाठी एका देहाचा उपयोग करून माहीत तरी होत का त्यांना की ते काय करत आहेत….
शाळेत साधं शिक्षकांनी चुकल आणि मारल तरी इतका काय राग येतो की काय करू ….आणि आपली चूक कशी सुधारावी की पुन्हा मार न पडावा..

आणि इथे

एक बलात्कारी व्यक्ती..
त्या स्त्री च्या आयुष्याला चपराक मारतो जीचा त्यात काही दोष नसतो,
तिच्या देहाला त्रास करून तिच्या आत्म्याला त्रास देतो,
तीच जगणं मुश्किल करून टाकतो,
तिचा मान सन्मान धुळीत मिळवतो,
तिने आयुष्य भर केलेल्या कर्तुत्वाला मातीत मिळवतो.
तिच्या स्वप्नांना मारून टाकतो,
तीच आयुष्य संपवतो…
तिच्या घरच्यांचं जगणं मुश्किल करतो,
तिच्या घरंच्या च्या स्वप्नाचा बळी घेतो
त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो,
त्यांनी आयुष्भर मिळवलेल्या जमापुंजी मातीत मिळवतो.
तिच्या आणि तिच्या भावनिक आणि जगण्याच्या सर्व च “अस्तित्वांचा ” खून करून टाकतो,…

लिहायला शब्द कमी पडतील माझे पणं त्यांच्या वेदना अगणित असतात वनवा सारखे पेट घेत असतात….

आणि एक बलात्कारी पुरुषाच्या बाबतीत काही बोलायचं आहे ते हे की कोणतीही व्यक्ती चा स्वभाव किंव्हा गुण तशी नसतात कालांतराने बदल होत जातो आणि जस फळामधे एखादा आंबा खराब निघाला की तो बाकीच्या पणं आंब्यांना खराब करतो तसच काहीतरी होऊन जात..
बालपणापासून जे गुण आणि प्रतिज्ञा अंगी बाळगून असतो तो कुठेतरी अवगुनात परिवर्तन होतात आणि ते अवगुण कधी राक्षसी वृत्ती त येतील सांगता येत नाही..

म्हणतात वाईट गुण लगेच अंगी बिणले जातात, पणं चांगले गुण अंगी बिनायला खूप वेळ लागतो अस का अस्त….

बर हे जरी अस असल तरी वाईट गुण घ्यायचेच नाहीत हे पक्क ठरवलंच मनाशी तर का बरं वाईट राक्षसी वृत्ती आपल्या विचारात प्रवेश करतील.
पण ही गोष्ट स्वतः ला समजन गरजेचं आहे, आत्मसात करण गरजेचं आहे…

व्यसनात येणारे मद्य, सिगारेट, तंबाखू यावर स्पष्ट पने लिहिलेलं अस्त की
” सिगारेट स्वास्थ्य साठी हानिकारक आहे”
” तंबाखू स्वास्थ्य साठी हानिकारक आहे”, त्याने कॅन्सर होतो
” मद्य स्वास्थ्य साठी हानिकारक आहे”

पण यात लिहिलं जरी असल तरी काय याची विक्री बंद केली जाते…काय यांची दुकान बंद केली जातात

नाही…..

ते आपल्यावर अवलंबून आहे की काय योग्य आहे आणि अयोग्य आपल्या ला यांचं सेवन करन कितपत धोकादायक आहे. की नाही

तसच टेलिव्हिजन वर दिसणाऱ्या घटना, चित्रपटातील काही विचित्र सीन्स, अश्लील साँग्ज, अश्लील घटना, अश्लील फिल्म्स, लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम घडवतात, …

चमकणारी कोणतीही गोष्ट सोन किंव्हा मौल्यवान वस्तू नसते , त्या फुटलेल्या काचा सुध्धा असू शकतात ज्या एकदा आपल्या पायाला लागल्या की फक्त दुखापत च होणार आहे यापलीकडे काही च नाही

आणि कधी त्या विचारावर परिणाम करतात त्यांनाही कळत नाही, वयात येतील तसे वाईट संगती आणि विचार अगदीच ठळकपणे त्यांच्या विचारावर गिरवले जातात…

त्यामुळे गरज आहे स्वतः च्या चांगल्या गुनात कितीही काही ही होऊ बदल नाही घडू द्यायचा आहे , समाजात चांगले गुण आणि वाईट गुण दिसणार च आहेतच या नाण्याच्या दोन बाजू आहेत,. पण स्वतः ठरवलं पाहिजे की मी कुठे चुकत आहे..

एक बलात्कारी पुरुष एका स्त्रीचा बलात्कार करण्याआधी
त्याने घेतलेल्या शिक्षणाचा ,
गुरुजनानी दिलेल्या ज्ञानाचा ,
आई वडिलांनी केलेल्या प्रेमाचा ,
आजी आजोबांनी ठेवलेल्या विश्वासा चा
आपल्या चांगल्या भाऊ बहिणीच्या आदराचा, शिकलेल्या डिग्रीचा,
नातेवाईकांच्या अपेक्षांचा,
मित्रांच्या मैत्रीचा,
सर्वात महत्वाचं म्हणजे आई ने छातीला लाऊन पहिलं अन्न दिलेल्या दुधाचा

वरील सर्व गोष्टी एक “अस्तित्व ” आहेत त्या एक “भावना” आहेत “नाती” आहेत आणि या सर्व “अस्तित्वाचा” बलात्कार वासनेचा विचार येताच क्षणी तो करून टाकतो…

द्वेष, मत्सर, वासना, मोह या पासून दूर राहायचं आहे हे शिकवलं आहे आपल्याला…

आपले जवान आपल सर्व घरदार सोडून सहा सहा महिने वर्षभर येत नाहीत आपल्या रक्षणासाठी तिथे सीमेवर आहेत आणि देशात आपण आपल्या आया बहिणींना कस ठेवलं पाहिजे याचा विचार आला पाहिजे….

आज छत्रपती महाराज असते तर काय वाटलं अस्त त्यांना थोडी तरी लाज शरम, आई जिजाऊ नी काय शिकवल आपल्याला, ….

का ह्या बलात्कारी वृत्ती जन्माला येतात, का अगणित अस्तित्वाचा नाश करतात, शिक्षा देऊन एक बलात्कारी पुरुष नाही सुधरू शकत, फाशी पणं कमी आहे अश्या लोकांसाठी , मुळात शिक्षा तर फारच कमी जणांना मिळते, बाकीचे तर असेच सुटूनही जातात, कोर्ट मध्ये असंख्य केसेस तश्याच वर्षानुवर्ष रेंगाळत आहेत..

त्यासाठी काय केलं पाहिजे . ..
ज्यांच्या मनात आणि विचारात राक्षसी वृत्ती शिरत असेल तेंव्हा च तिला आळा घाला, आठवा तो शिवबा जे होते म्हणून आज आपण ताठमानाने जगतो आहोत…..

वेळेआधीच डेंग्यू.मलेरिया झाला की त्याचे विषाणू आपण औषध घेऊन जसे बरे करतो तसेच आपल्या विचारात राक्षसी वासना, मोह प्रवेश करत असेल तर लागलीच आपल्या चांगल्या गुणांना जतन करायला सुरुवात करा आठवा आपले शिवबा काय शिकवून गेले,
आठवा आपली प्रतिज्ञा,
आठवा हुतात्मे का शहीद झाले ,
आठवा छत्रपतीनी आपल राज्य कस मिळवलं आपल्या आया बहिणी कश्या जतन केल्या आणि त्याच राज्यात, देशात अश्या अगणित अस्तित्वाचा बलात्कार करत गेलात तर आपला देश सुरक्षित नाहीय…जागे व्हा वेळेपूर्वी …

वासना एक मृगजळ आहे, एकदा त्यात पडला की तुम्ही ही संपला आणि अशी अगणित अस्तित्व ही संपली, आपन जे करणार तेच येणारी पिढी घेत जाणार जितक थांबवता येईल वाईट विचारांचं चक्रव्यूह तितक थांबवा,

ही बदनामी स्त्री ला देऊन काय मिळणार आहे, देणार च आहात तर मान द्या, सन्मान द्या, आदर करा, प्रेम द्या, कोणतीही स्त्री आपल्याला होणाऱ्या त्रासाला नेहमी लपवून ठेवते कारण तिच्या आपल्या लोकांना काही त्रास नको व्हायला, संसार करत असताना कुटुंबाचा पहिला विचार करते,..आपल मन कुठेतरी मारत असते, घरचे पुरुष जेवल्या शिवाय त्यांच्या घशातून घास जात नाही… द्यायचा च असेल तर एखादा मायेचा घास भरवा..
८ मार्च ला फक्त स्टेटस ठेऊ नका आपले विचार बदला,

काही सत्कर्म नाही च होत असतील तुमच्या कडून तरी चालेल पण दुष्कर्म न व्हावे याची काळजी घ्या..

आपल्या आईला अभिमान वाटेल अस काहीतरी करून दाखवा,

टेलिव्हिजन , मोबाईल वर काही चुकीचं पाहत बसण्यापेक्षा वाचा ज्ञानेश्वरी, शिकून घ्या बुद्धांचे विचार, पारायण भरवा, भगवदगीता वाचन करा,….आणि हे ही होत नसेल तर एकदा तरी ऐका हरिपाठ….ज्याच्यात खूप शक्ती आहे दुर्गुनाना दूर ठेवण्यासाठी….

स्वतः जगा सन्मानाने स्त्रियांना ही जगू द्या सन्मानाने स्त्री पुरुष हे नात समजण्यासाठी आहे, जपण्यासाठी आहे ,… कुरतडण्यासाठी नाहीय..
हे असंख्य अगणित बलात्कार आपल्या येणाऱ्या अगणित पिढ्यांना चुकीचं वळण देऊन जाणार…ताठ जगायचं की पुढच्या पिढीने आपली नाव काढली पाहिजेत अस जगावं हे स्वतः ठरवावं

स्त्रीही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे,
तिची सरेआम विटंबना होत असताना पाहून जिजाऊ च काळजाचे तुकडे होत असतील,
इतकी तरी लाज बाळगा,
वासनेचा विषाणू आपल्या विचारात शिरकाव करत असेल तर तत्काळ मध्ये चांगल्या विचारांचे औषध घ्या …..

इथे प्रश्न आहे एका स्त्रीचा,
इथे प्रश्न आहे अगणित अस्तित्वांचा,
नका होऊ द्या आपल्या धर्तीवर स्वतः च्या आणि दुसऱ्याच्या अस्तित्वांचा एकही बलात्कार,
नाहीतर त्याच्या धडाचे एकही भाग सापडणार नाही
इतके वार होतील..
छत्रपती शिवाजी महाराज करतील एक ना एक दिवस पुन्हा हा ही चमत्कार….

——-……………..
Hi,
मी रुपाली सध्या मुंबई त वास्तव्य करत आहे , लिहायचं भरपूर आहे पणं तितका वेळ नाही मिळत, कधी ऑफिस चा लंच टाईम, कधी प्लॅटफॉर्म, कधी लोकल, कधी मध्यरात्री त च काहीतरी आठवत, कधी पहाटेच
शांत बसून कुठेतरी लिहावं वाटत पणं ती वेळ काही येत नाही आणि ती वेळ येण्याची मी वाट सुद्धा पाहत नाही वेळ येत नाही स्वतः आणावी लागते…

माझी मुलगी ला ५ वर्ष कंप्लीट नाही झाले अजून पणं तिला माहिती आहे मी लेख लिहिते, तिला कळत नाही लेख म्हणजे काय पणं

” मम्मा तू लेख लिहिणार आहेस का मग मी लवकर झोपते” इतकं काहीतरी तिच्या बोबडे बोल बोलून जाते की कौतुक वाटत…

माझ्या मैत्रीनी शमिका आणि नैना सुद्धा मी शांत असली तरी समजून जातात आज आतल्या आत काहीतरी लेख चालू आहे….सो हा सपोर्ट खूप काही देऊन जातो….

माझ्या या लेखातून मी इतकंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की…

मी एखाद्याची नजर किंव्हा दृष्टी नाही बदलू शकत पणं हा एखाद्याचा दृष्टिकोन नक्की च बदलू शकते, आणि दृष्टिकोन बदलला की दृष्टी नक्की च बदलेल…

धन्यवाद
रुपाली स्वप्नील शिंदे
आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. छान लेखन! बलात्कार नुसत्या वासनेतून नाही तर बदल्याच्या भावनेतूनही केले जातात. ही एक भयंकर मानसिक विकृती आहे. -ॲड.बी.एस.मोरे

- Advertisment -spot_img

Most Popular