Homeमुक्त- व्यासपीठआई घेऊ दे गं जन्म मला

आई घेऊ दे गं जन्म मला

आई घेऊ दे गं,
तुझ्या पोटी जन्म मला……….
हे सुंदर जग मलाही,
तुझ्यासोबत पाहुदे जवळून सारा………

मी मुलगी आहे म्हणून,
का धरलास माझ्यावर एवढा राग………
एकेदिवशी तुलाच माझा अभिमान वाटेल,
तुच देशील पाठीवरती कौतुकांची थाप………

बाबांच्या छत्रछायेखाली होऊदे,
मला लहानंच मोठं…………
तुझ्या अंगाईच्या कुशीमध्ये पाहुदे,
खुप शिकुन स्वप्न छोटसं………

आई सिंधुताई या मातेला,
तु का विसरलीस………..
रक्ताचं नातं नसुन ही सार्या,
अनाथ मुलांची ती माता झाली………..

आई येते का गं माझी,
हाक कानी तुझ्या ऐकु…………
नको करुस ना असा,
प्रयत्न तुझ्यापासुन मला करायचा दुर………

या जगात येऊन हे जग,
जवळुन पाहुदे मला………..
नको करुस प्रयत्न संपवायचा,
तुझी मुलगी विनंती करते तुला……….

               कु. प्रणिता धुरी ✍️
                ता.देवगड 
                जि.सिंधुदुर्ग
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. नमस्कार मॅडम…
    खरंच आज आशयाचे साहित्य लिहिले जायला हवे. ज्यांना मुलगी जड वाटते त्यांना तीच मुलगी मोठी झाल्यावर कर्तृत्ववान होते आणि तिच्या हातून मोठे कार्य घडते त्यावेळी मात्र तिचे कौतुक केले जाते.
    हेच गोडवे मुलीच्या जन्मावेळी मात्र का नाही गायले जात.

    ज्यांना मुलगी नको वाटते त्यांना इतकंही काळात नाही की, आपली आईही एक मुलगीच होती शिवाय ज्या लेकीला जन्म देणारी आहे ती आपली पत्नीही एक कोणाचीतरी मुलगी, लेकच आहे.

    ज्या मातांना वाटतं आपल्याला मुलगी नको आणि झाल्यावर रस्त्यावर ते जन्मलेलं बाळ सोडून जाताना त्यांना का नाही वाटत, आपणही एक स्त्रीच आहोत. लाज वाटली पाहिजे अशा नालायक बुद्धीच्या लोकांना. मग तर तिचा जन्म होण्याआधी अशा वागणाऱ्या लोकांनीच स्वतःला संपवावे, कशाला हवे ते जीवन जे येणाऱ्या जीवाला जीव न लावताच त्यांच्या आयुष्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न करतात.

    आपण लिहिलेली कविता, शब्दांची मांडणी खूपच छान आणि मनाला चटका लावून जाणारी आहे. शिवाय वाचणाऱ्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

    धन्यवाद…!!💐

  2. सुंदर आहे कविता, पणं अजून थोडी विस्तीर्ण हवी होती ..
    नक्कीच हा विषय खूप सुंदर आहे याबद्दल जितक बोलू, लिहू तितकाच मुलीबद्दल आदर मान सन्मान त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि तो आपण लेखातून , शब्दातून नक्कीच बदलण्यास मदत होईल. धन्यवाद

- Advertisment -spot_img

Most Popular