विरार गावच्या उंच डोंगरात
आई जीवदानी देवी उभी थाठात
आई तुझे अतिशय सुंदर मंदिर
दर्शनासाठी भक्तांचे मन आतुर
कितीही वेळा आई तुजे दर्शन होऊदे
सारखी भेटण्याची इच्छा होते मनामध्ये
मंदिराची पायरी चढताना आई
तुला भेटण्यासाठी भक्तांची होते घाई
विघ्ने वाट्याला कितीही येउदेत
आई तुझ्या कृपेने दूर होतात
दररोज तुजे नाव येई मुखात
तू पावतेस आम्हाला विरार गावात
विघ्ने वाट्याला कितीही येउदेत
आई तुझ्या कृपेने दूर होतात
नवरात्रीला जीवदानी मंदीरात
भक्तांचा पूर ओसंडून असे वाहत
आई तुझा आशीर्वाद दे आम्हास
नमस्कार माझा अखंड तुझ्या चरणास
कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
मु.पो. शिरखळ,गाव.हातीप(तेलवाडी)
ता.दापोली,जि.रत्नागिरी
मो.९६१९७७४६५६
Email : swapniljambhale6211@gmail.com
समन्वयक – पालघर जिल्हा