Homeघडामोडीआणि…प्रियाने केले हात तुटक्या मुलाशी लग्न.

आणि…प्रियाने केले हात तुटक्या मुलाशी लग्न.

बुलढाणा – (अमित गुरव ) -: चिखली तालुक्यात सध्या एका लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. कारण एका हात तुटलेल्या मुलासोबत मुलीने हट्टाने लग्न करून घेतलं. पण असे तर खूप ठिकाणी घडतं मग यात आश्चर्य वाटण्यासारखं ते काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.
विशाल इंगळे नामक मुलासोबत प्रिया घेवंदे हीचे ३ महिन्यापूर्वी लग्न ठरलं होते ; नव्या वैवाहिक जीवनाची स्वप्न पडत होती विशाल ट्रक वर चालक म्हणून काम करत होता , लग्नाची तयारी दोन्ही कुटुंबातील सदस्य उत्साहात करीत होते.
पण नशिबाने सर्वांची परीक्षा घेण्याचेच ठरवले होते . हे विशाल च्या मोठ्या अपघात झाल्याने सिद्ध झाले. औरंगाबाद येथे उपचार घेत असताना डावा हात पूर्ण निकामी झाल्याने तोडावा लागला. वाहनचालकांचे उदरनिर्वाहाचे स्रोत म्हणजे हात अन तोच नाही त्यामुळे कमाईचा प्रश्न पडला अश्यात घरचे लग्न मोडण्याचा विचारत होते. मात्र या तीन महिन्यात वेगळीच प्रेम गाथा जन्म घेत होती. दोघांनाही एकमेकांची ओठ लागली होती. उपचारांती आमचे लग्न होईल , सुखी संसार करू अशी स्वप्नंवत जगात रमू लागले होते. प्रियाने च्या मनाने विशाल ला आपला जोडीदार मानले होते.
घरच्यांचा विरोध होताच पण आमचे लग्न झाले असते आणि मग असा प्रसंग ओढवला असता तर तुम्ही काय केले असते? सर्व लोक ४ हातानी संसार उभारतात पण आम्ही ३ हातानी उभा करू असे बोलून प्रियाने सर्वांचं मन जिंकलं आणि पुन्हा दोघांच्या आई-वडिलांनी पुठाकर घेऊन मोजक्याच नातेवाईकांच्यात विवाह सोहळा संपन्न झाला.
अश्या ह्या लग्नाची आणि प्रियाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुकाने चर्चा होत आहे. थोड्याश्या स्वार्थासाठी लग्न मोडणाऱ्या च्या समोर हा आदर्श आहे.
ह्या आगळ्यावेगळ्या लग्नाची ही गोष्ट सिनेमातील काल्पनिक कथानकात शोभेल अशी असली तरी सत्य आहे.
प्रिया आणि विशाल या नवंदांपत्यास लिंक मराठी कडून वैवाहिक जीवनास शुभेच्छा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular