पहाट नवीन पर्व नवे
सुखाची अन् समाधानाची
स्वागत नववर्षाचे
आनंदाची गुढी उभारूनी
गुढी उभारू शिवरायांच्या विचारांची
भेदभाव सारे संपवूनी
ऐक्याची आणि समतेची
आनंदाची गुढी उभारूनी
गुढी उभारू संस्कृतीची
मतभेद आपल्यातली मिटवूनी
सौख्याची अन् वारसाची
आनंदाची गुढी उभारूनी
गुढी उभारु विश्वासाची
स्वप्नांना बळ देऊनी
समतेची अन् प्रेरणेची
आनंदाची गुढी उभारूनी
गुढी उभारू पुस्तकांची
आदर्श व्यक्तिमत्व बनवूनी
वाचनाची अन् लिहण्याची
आनंदाची गुढी उभारूनी
गुढी उभारू भावनांची
साथ देत एकमेकांची
नात्यांची अन् आपुलकीची
आनंदाची गुढी उभारुनी
नेहा नितीन संखे ✍️✍️
समन्वयक – पालघर जिल्हा