Homeमुक्त- व्यासपीठआयुष्याचा धनी…..

आयुष्याचा धनी…..

आयुष्याच्या वाटेवर एकटाच
मी एकांतात उभा आहे
काट्यावरचंच आयुष्य माझं,
सुगंध घेण्या मला कुठे मुभा आहे…..

परिजन म्हणती भिकारी तू सदाकाळ आहे
तरीही खांद्यावर माझ्या जबाबदारीची गदा आहे
सूर्यास्त झाला की माझी निरंतर सुबह आहे
सूर्य उदयासी आला की मग माझीच निशा आहे…..

थकलोय रे आता शिदोरीसाठी वणवण धावून
विचारतोय स्वतःलाच काळजावर हात ठेवून
कोण होते ते ज्यांच्यासाठी ठेवलंय कमवून
आपलेच देतील रस्त्यावर कचऱ्यासारखे फेकून……

अरे कोण करतोय आता उगा उद्याची बात
माझा मीच मला अंतर्यामी घालितो साद
जगलो तरच राहील चिकटून मला माझी जात
मेलो तर सरसावतील का कुणाचे माझ्यासाठी हात….

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

5 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular