Homeमुक्त- व्यासपीठउत्तराने तुझ्या

उत्तराने तुझ्या

उत्तराने तुझ्या या,
मज पडले प्रश्न भरपूर…
स्वप्नही जे पाहिले होते
राहिले का ते अपुर..
उत्तरा पूर्वी तुझ्या या मी
पाहिली स्वप्न अनोखी…
प्रश्नात पाडून गेली तू अन्
जाहली ती पोरखी…
ढासाळलेल्ल्या या हृदयाला
देशील का तू आधार…?
उत्तराने तुझ्या या,
मज पडले प्रश्न भरपूर…
स्वप्नही जे पाहिले होते
राहिले का ते अपुर…
वाटे सांगावे कोणास अन्
सला तरी तुझ्या उत्तराचा घ्यावा….
पण काळजी अजुनही तुझी म्हणुनी,
वाटे एकट्यानेच हा प्रश्न सोडवावा…
घाव ही स्वतःच झेलावे अन् ,
दवा स्वतःच करावी हा कोणता करार..
उत्तराने तुझ्या या,
मज पडले प्रश्न भरपूर…
स्वप्नही जे पाहिले होते
राहिले का ते अपुर…
वाटे तू पुन्हा एकदा,
विचार माझ्या प्रश्नाचा करावा…
मनी असेल जरी तुझ्या मी तरी
पुन्हा सहवास दोघांचा घडावा….
शेवटच्या या दोन ओळीचे
विचार करुनी पुन्हा कळव उत्तर…
उत्तराने तुझ्या या,
मज पडले प्रश्न भरपूर…
स्वप्नही जे पाहिले होते,
राहिले का ते अपुर…

  • अनिकेत शिंदे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular