या भारत देशामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही पद्धत आहे, लोकशाहीच्या मार्गाने म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य अशी लोकशाहीची व्याख्या असतांना या देशांमध्ये या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय काहीच कळत नाही. दरवर्षी अधिवेशन भरतात अर्थसंकल्प मांडले जातात मात्र यामध्ये शेवटच्या घटकाचा विचार केला जात नाही. संकल्प अधिवेशन, निव्वळ घोषणा विरोध निरर्थक गोष्टींमध्ये निघून जातात आणि त्यातल्या त्यात फक्त आमदारांसाठी काही सुख सोयींसाठी गाडी बंगल्यासाठी त्यांच्या पगार वाढीसाठी निर्णय घेतले जातात असे दिसते, आमदारांनी आमदारांसाठी चालवलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र होय या आधीच्या सरकारने दिन दुबळ्या, गरीब वंचित ,शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय, या लोकांसाठी काहीच केलं नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे आत्ताच सरकार चालत आहे, कर्जमाफी च्या खोट्या घोषणा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा बेरोजगारांना नोकऱ्या अशा फसव्या घोषणा देऊन एकमेकांना फसवून ही सरकारे सत्तेवर आलीत मात्र या लोकांनी समाज हिताचे काही कार्य केलेले नाही, हजारो प्रश्न कोरोना सारखी महामारी ओला कोरडा दुष्काळ चुकीची धोरणं यासाठी काम करण्याची गरज आहे मात्र हे सरकार दळभद्री विचारांच आहे आधी आमदारांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज, नंतर आमदारांची पगार वाढ त्याच्यानंतर आता आमदारांसाठी घरे अशा अनेक सुखसोयी फक्त आमदारांसाठी जनतेसाठी मात्र काहीच नाही, गोरगरीब लोकांच्या घरकुलांसाठी अनेक अटी शर्ती त्यात घरकुलांसाठी वेळेवर पैसे मिळत नाही अतिशीत वाईट अशी अवस्था ग्रामीण भागाची झालेली आहे नवीन योजना तयार करून वर्तुळाबाहेर च्या लोकांसाठी काही तरी करता येईल का असा साधा विचारही हे सरकार करत नाही, शेतीचे सुशिक्षित बेरोजगारांचे ,सध्या गाजत असलेले एसटीचे, असे अनेक प्रश्न आहेत मात्र या कपाळकरंटे स्वार्थी सरकाराच्या लोकांना हे दिसत नाही, मी असं म्हणेल ठाकरे यांना सरकार चालवता येत नाही आणि फडणवीसांना विरोध करता येत नाही दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यांना हा महाराष्ट्र वाटून खायचा आहे, असे चित्र सध्या दिसत आहे ग दि माडगूळकरांच्या काही ओळी आठवतात
उद्धवा अजब तुझे सरकार
लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार
इथे फुलांना मरण जन्मता दगडांना पण चिरंजीवीता
बोरी बाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार
लबाड जोडती इमले माड्या गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार
उद्धवा अजब तुझे सरकार
- संतोष पाटील
मुख्यसंपादक