एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा करू एकची जय जयकार
प्रकाश आपला निर्मवू स्व कर्तुत्वे,कापीत जाऊ अंधकार
शिवरायाची शपथ सांगतो राहू
शिवतत्त्वासी एकनिष्ठ हो
महाराष्ट्रातले सगळे मराठे आम्ही
ना कोण श्रेष्ठ वा कनिष्ठ हो
वादळातली नाव ही, न थांबणे
आता, पैलतीरी भेदत जाऊ पार!१!
एक मराठा लाख मराठा
या हो माझ्या मर्दमराठ्यांनो सह्याद्रीवरून
खुनवीती शिवरायांच्या पाऊलखुणा
अजिंक्य अभेद्य ठेवू गड-किल्ले हा
एकची तळपुद्या विचार पुन्हा पुन्हा
स्पर्धेचे युग होईल दमदाटी
सावरून आवरा नको उशीर फार!२!
एक मराठा लाख मराठा
मिथ्य अभिमान हा आपला
रोडावीतो पायातली गती
आत्मबल जागृत ठेवून पाद्रकांत
करू शिखरे आनंदास भरती
आता येणार ना कोणी शिवबा
एक मेका सहाय्य करू,हाची आधार!३!
एक मराठा लाख मराठा
सुटुद्या कितीही वादळ
वारे वा करील मृत्यू ही इशारे
इथे थांबणे मुश्कील आहे
जिंकून घेऊ इच्छित सारे
जिजाऊ माते दे आशीर्वाद आम्हाला
सीमोल्लंघन करु,न व्हावे मातीला भार!४!
एक मराठा लाख मराठा
– जगन्नाथ काकडे मेसखेडा
मुख्यसंपादक