कळप

काल परवा एका
गिधाडांच्या टोळीने माणवी
वस्तीवर हल्ला केला.
नेमकी खंगलेली भंगलेली पांगलेली
भोळी भाबडी माणसेच
उचलायला सुरुवात केली.
धडधाकड, चानाक्ष,
कावेबाज,मगरूर कळपातल्या
माणसांकडे गिदाडांनी
बघीतले सूद्धा नाही..
त्यांना स्पर्श सूद्धा केला नाही..
न राहवून त्यातल्या
खंगलेल्या भंगलेल्या पण
एका विद्रोही माणसाने
प्रतीकार करत त्या गिधाडांना
प्रश्न केला…


तूम्ही नेमकं निवडून निवडून
कमजोर आणि असंघटित
माणसांनाच का उचलत आहात?
तेंव्हा त्या गिदाडांनी त्याला
जे सांगितले तो ही एक
इतिहासच आहे
की आम्ही हे शिकलो माणसांच्या इतिहासातूनच …
अन् त्या गिदाडांनी त्या
माणसाला उचलता उचलताच
सोडुन दिले…
आणि म्हटले जा आता
तू यांच्यातला नाहीस…
तूझ्या सारख्या प्रश्न विचार्या
तापदाई माणसांना
नेऊन आम्ही आमचा
ताप वाढवत नसतो, कारण
तूम्हा सर्वांना उचलायला
मदत करणारे
तूझ्या असंघटित कळपातले
बरेच आहेत, ज्यांना आम्ही
मागच्या वेळी उचलले होते. ….
तूला सोडून देऊन
उपकार करत आहोत आम्ही तूझावर…
मात्र तू आता यांच्यासाठी
चळवळ करायची नाही, वळवळ
करायची नाही..
गूमान कळप बदल.
गूमान कळप बदल…
मात्र त्याण माग राहून कळप नाही बदलला
तर भंगलेल्या पांगलेल्यांचा एक कळपच तयार केला, आणि त्यांना कळपात आणले..

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

  • जगन्नाथ काकडे मेसखेडा
    ता. मंठा
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular