Homeघडामोडीकळेकर यांचा जि. प. च्या सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मान

कळेकर यांचा जि. प. च्या सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मान


आजरा, ता. २६ (प्रतिनिधी)
सोहाळे (ता.आजरा) येथील पत्रकार सचिन धोंडीबा कळेकर यांना जि. प. च्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील छ. शाहू महाराज सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून कळेकर यांचा सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी केले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ व पाटील यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

Table of Contents

पत्रकार कळेकर हे गेली १२ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात काम करीत आहेत. सध्या ते दै. महासत्ताचे आजरा तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पत्रकार कळेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्कार स्विकारतेवेळी निखिल कळेकर, चंद्रकांत कोंडूसकर, धोंडीबा देसाई, प्रा. संदीप व्ही देसाई आदी उपस्थित होते.

फोटो- कोल्हापूर : येथील जि. प. च्या छ. शाहू महाराज सभागृहातील पुरस्कार वितरण कार्यक्रमात पत्रकार सचिन कळेकर यांचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मान करताना राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील. शेजारी प्रशासक संजयसिंह चव्हाण यासह निखिल कळेकर, धोंडीबा देसाई व चंद्रकांत कोंडूसकर (छाया : प्रा. संदीप व्ही. देसाई)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular