Homeमुक्त- व्यासपीठकवडसा मनाचा

कवडसा मनाचा

जीवन कसेही असो.मग ते व्यस्त किंवा हाती मोकळा वेळ असलेले. कामाचा आवाका हा नेहमी कमी-जास्त होत असतोच.आणि आपणही या वर्तुळात गोलाकार आपल्या इच्छा-आकांक्षाच्या याद्या घेऊन फिरत असतो.आणि म्हणूनच मला जीवन ही सरिता निरंतर प्रवाहित प्रक्रिया वाटते.जी वाट गवसेल तशी मार्गस्थ असते.कधी वेगावर स्वार होऊन तर कधी नि:शब्द लय पकडत संथ तर कधी आवेगाने तुटून पडणारी. हा अखंड प्रवास सतत चालूच असतो……..

कितीतरी अगणित क्षणं रोज हातातून निसटून जाणारे असतात. या क्षणांची तमा कधीच न बाळगता आपण आपल्या जीवनातील आनंद शोधत असतो.आणि हाच मुद्दा मोठा मुश्कील आहे.’माझा आनंद’. आपण आपला आनंद शोधतो खरे.मात्र तो आनंद इतरांना दु:ख न देता शोधता आला पाहिजे. आणि खरतर आपल्या आनंदाची आणि सुखाची अंतिम परिसिमा आपल्याला कधीच सापडत नाही. आणि सापडणारी देखील नसते……..

जेव्हा कडक उन्हात घशाला कोरड पडते.जीव पाण्यासाठी लाही-लाही होतो.अशा क्षणी जर अनाहूतपणे आपल्याला अचानक थंडगार पाणी कोणी पिण्यास दिले तर? तर नक्कीच त्या क्षणी ती व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते.तृष्णा भागल्याचे आत्मिक समाधानासोबत माणसांने एका दुसऱ्या माणसांची तहान भागवली.ही भावना मोठी श्रेष्ठ ठरते.अगदी मंदिरात रोज देवदर्शन करुन बाहेर पडताना न वाटावे. इतके स्फटिक शुभ्र छटांचे वलय मनाभोवती तरळून जाते……

मला हेच सांगायचे आहे की,अनपेक्षित क्षणं माणसांला खरे आत्मिक सुख तसेच दु:ख देणारे असते.कारण ‘मनात कैक वर्षीची इच्छा होती’. आणि ती पुर्ण झाली.म्हणूनचा आनंद वेगळा आणि इच्छा, खात्री नसतानाही हाती लागलेला आनंद निराळा. आपण रोज रस्त्यावर चालतो.पण रोज आपली नजर कुठे पैसे सापडतात का? हे शोधत नसते.आणि अचानक एखादी नोट नजरेत येते.तेव्हा त्या नोटेपेक्षा ती नोट अपेक्षित मिळाली.हा आनंद खुप वेळ रेंगाळता राहतो……..

सरतेशेवटी इतकेच की,आपण माणूस म्हणून माणसांची तहान असो किंवा छोट्या कामातून केलेली मदत असो.ही त्या व्यक्तीला कायमस्वरूपी मनात राहणारी. आपल्याकडून दिलेली एक सात्विक भेट असते.अशीच अनपेक्षित भेट आपल्याला देखील मिळेल हा विचार मनाला सुखद वाटतो.रोज व्यवहारी जगताना. कुठेतरी काही क्षणं हे फक्त आपल्या मनाला विचारुन निर्णय घ्यावा. नफा-तोटा हे व्यवहारी हिशोब बाजूला सारून.फक्त ‘आपलाच आनंद’.यापेक्षा माझ्यासोबत इतरांचाही आनंद.ही व्याख्या मला जास्त सोईस्कर वाटते.बाकी आपण जाणकार आहातच……….

मनोज वढणे.
तालुका-श्रीरामपूर
जिल्हा-अहमदनगर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. नमस्कार –
    सर – आपण आयुष्यात येणाऱ्या आनंदाच्या क्षणांची पारख खूप छान शब्दांत मांडूली आहे.
    आपण आपले जीवन जगत असताना आनंदाचा क्षण नेहमीच शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो मिळाला की, आपले मनही सुखावले जाते.
    हा “आनंद” जर एखाद्याला आकस्मिकपणे मिळाला तर मात्र त्याला एक वेगळीच अनुभूती मिळते, आणि आपणच सर्वसुखी असल्याचा भास होऊ लागतो. परंतु हा आनंद चिरकाल कसा टिकवता येईल हे मात्र ज्याला त्याला स्वतःलाच ठरवावे लागते.

    धन्यवाद – सर

  2. आनंदावर छानच लिहिले आहे.👌🏻👌🏻अप्रतिम

    आयुष्य जगताना आनंदाचे स्थान महत्वाचे असतेच. पण तो फक्त घेण्यानेच नाही तर निरपेक्षपणे देण्यातून जास्त मिळतो. आणी तो चिरकाल टीकणारा असतो. अपेक्षित गोष्टीं मिळाल्याने आनंद होतोच पण अनपेक्षित पणे एखादी गोष्ट मिळते तेव्हा हाच आनंद व्दिगुणीत नक्कीच होतो. हे छान नमूद केले आहे.

- Advertisment -spot_img

Most Popular