Homeकृषीकांदा खरीप कांदा खत व्यवस्थापन

कांदा खरीप कांदा खत व्यवस्थापन

👉वाफेनिर्मितीपूर्वी एकरी ६ चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडीखत किंवा ३ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.
👉खरीप कांदा पिकास एकरी नत्र ३० किलो, स्फुरद १६ किलो आणि पालाश १६ किलो देण्याची आवश्यकता असते.
👉जमिनीमध्ये गंधकाचे प्रमाण एकरी १० किलोपेक्षा जास्त असल्यास एकरी ६ किलो आणि १० किलोपेक्षा कमी असल्यास एकरी १२ किलो या प्रमाणे गंधक द्यावे.
👉रोपांच्या पुनर्लागवडीच्या वेळी १/३ नत्र आणि स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी द्यावी.
👉कांद्यासाठी ठिबक सिंचन वापरत असल्यास, पुनर्लागवडीवेळी १/३ किलो नत्र देऊन उर्वरित नत्र सहा समान हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे दर १० दिवसांनी ६० दिवसांपर्यंत द्यावे.
👉ॲझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू (पी.एस.बी.) या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी २ किलो प्रति एकर या प्रमाणे सेंद्रिय खतातून द्यावे.
👉सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून द्यायची असल्यास, लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसापर्यंत द्यावीत. फवारणीद्वारे देताना ४५ दिवसांनी आणि ६० दिवसांनी द्यावीत.

  • संकलन
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular