Homeवैशिष्ट्येकाहीतरी नवीन करूया……

काहीतरी नवीन करूया……

यावर्षी दिवस इतक्या गतीने पळत आहेत कि सणाचे दिवस ही वेगवान धावत आहेत. दसरा झाला आता दीपावली ही आली .

 दीपावली म्हणजे तेजोमय दिव्यांनी सजलेली , नटलेली बहरलेली  सांजेची लख लख चंदेरी रात्र आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजलेली पहाट.
आपण मध्यम वर्गीय आहोत , एक वर्ग श्रीमंतांचा आणि खाली एक वर्ग गरिबांचा , मध्यम वर्गीय म्हणजे एकंदरीत आयुष्यभर तडजोड करत करत यशाचे शिखर गाठत चालणे आणि पळणे हे आपले ध्येय आणि आपल्या आयुष्यात सण वार हे अगदी जीवा भावाच्या गोष्टी मग गणेश चतुर्थी असो की दसरा किंव्हा दिवाळी.

आपले ही जेमतेम उत्पन्न असते त्यात आपले आई वडील स्वतः साठी काही खरेदी करणार नाहीत पण आपल्या मुलांसाठी , त्यांच्या आई वडीला साठी काही ना काही तडजोड करून त्यांच्या चेहर्या वर आनंद मात्र आणतात.
श्रीमंतां ची तर नेहमीची दिवाळी असते पण असे नाही की त्यांना हि पैसे कमावण्यास मेहनत करावी लागत नाही , तेही आपल्या परीने खूप प्रयत्नशील असतात.

खाजगी नोकरदार व्यक्ती, सरकारी नोकरदार व्यक्तींना  बोनस किंव्हा काही भेटवस्तू भेटल्या जातात. पण खूप मोठा वर्ग असाही आहे जो या सर्व गोष्टी पासून वंचित असतो. उदाहरणार्थ मंदिरा समोर बसलेल्या  व्यक्ती , फुटपाथ च्या आजूबाजूला वास्तव्य करत असलेली फॅमिली , फुल , गजरे, फुगे , लहान मुलांची खेळणी , भाजी पाला , पणत्या , रांगोळ्या , घर सजावटीच्या वस्तू , फळे   विकून आपली पोट भरत जगत असतात .

त्यांना दिवाळी तच काय तर इतर वेळेस ही कधी नवीन कपडे , मिठाई या गोष्टी माहित नसतात , प्लॅटफॉर्म वर पाहिले तर अश्या आया खूप दिसतात ज्या हात पसरून पोटासाठी काहीतरी मागत असतात , काहीतरी आया थकून तश्याच प्लॅटफॉर्म वरच झोपून जातात . माझ्या सारखे खूप जण असतील जे दादर प्लॅटफॉर्म रोज पाहत असतील पाहून मन भरून येत.

विषमता आपल्याकडे भरमसाट प्रमाणात आहे .  आपल्या आसपास काय पाहायला मिळत असेल तर ते म्हणजे विषमता . पैशानी विभागलेला वर्ग.

जीवनावश्यक गोष्टी सुद्धा लाभत नाहीत असा मोठा वर्ग आहे . पदोपदी तो आपल्याला पाहायला मिळतो. काही प्रयत्न करून यशस्वी होतात ही पण काहीच आयुष्य जसे च्या तसे च राहून जाते.

मी दरवर्षी काही ना काही अश्या व्यक्ती साठी भेट देतेच माझ्या परीने मला जमेल तसे , माझ्या सारखे विचार असणारे हि अश्या व्यक्तींना काही नाही काही देऊ करतात.

पण यावेळी जरा वेगळाच विचार करूयात असा विचार मला आला आपल्या कपाटात खूप सारे कपडे असतात , जे आपण नेहमी तर वेअर करत नाही , सणवार असताच नवीन कपडे परिधान करत असतो. का नाही या दिवाळीला हि कपडे न खरेदी करता त्याच पैशात  अश्या गरजू व्यक्तींना दिवाळी ला काही खरेदी करून देऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो . जो आपण नवीन ड्रेस परिधान केल्यावर हि कमी पडेल इतका आनंद आणि समाधान .

कुठे फराळ द्या,  तर कुठे फटाके,  तर कुठे मिठाई त्यांना हि आपल्या आनंदात आनंदी होऊ द्या . शेवटी आनंद हि अशी गोष्ट आहे जी दिल्याने अजूनच आनंद द्विगुणित होतो.

मी तर विचार केला आहे तुम्ही हि करून पहा , फीलिंग सो गुड ना …

मॉल मधून त्याच पणत्या घेण्या पेक्षा रस्त्यावरून खरेदी खरा. त्यांच्या घरी ही दिवाळी साजरी होईल.

काहीतरी नवीन करा ..

आपले विचार मांडा , आयुष्यात फक्त पैसे कमवण्याची शर्यत जिंकू नका , माणुसकी आणि समाधान यातला हि आनंद मिळवत राहा .

माझा हा विचार काही लोकांनी जरी आत्मसात आणला तरी किमान १०० एक व्यक्ती ज्या आयुष्याच्या महत्वाच्या गोष्टीपासून वंचित असतात ते तरी यावेळी दिवाळी उत्साहात  साजरे करतील. गेल्या २ वर्षात कोरोना मुळे त्या लोकांना साधे जेवण ही नशिबी नव्हते. का नाही यावेळेस काही नवीन करू.

माझ्या लेखनाचा काहीतरी फायदा होत आहे यासाठी मी हि समाधानी असेंन आणि तुम्ही हि काहीतरी चांगलं करत आहात यासाठी माणुसकी नावाचं मेडल मिळवण्यात ही यशस्वी व्हाल. तुम्हाला ही फिलिंग सो गूड …..नक्की वाटेल.

काय म्हणताय मग ……सहमत असाल तर नक्की करा. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल तसे करा. तुमच्या घरच्या व्यवहारातून थोड जरी जमल तरी काही हरकत नाही.

शेवटी दिवाळी ही फक्त दिव्यांच्या प्रकाशाने उजळण्यासाठी नाही लोकांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य आणणे ही आहे.
कुणाच्या चेहऱ्यावर आनंद आणणे याहून सुंदर कार्य काही नाही. मनापासून त्यांनी दिलेला आशीर्वाद मिळणे हे सुद्धा काही कमी नाही.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !

दीपावलीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्या … !

धन्यवाद ..!

रुपाली शिंदे
आजरा  ( भादवन )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular