मुलगा गिधाड- पापा पापा मला माणसाचं मटण खायचे आहे..
बाबा गिधाड – (खुप विचार करुन) हे कसं काय शक्य आहे…??
मुलगा गिधाड- मला काहिही कारण सांगु नका मला माणसाचं मटण पाहिजे म्हणजे पाहिजेच…
बाबा गिधाड खुप विचार करतो आणि त्याला एक कल्पना सुचते…
तो मुलाला जवळ बोलावून घेतो… आणि म्हणतो तु मला अगोदर गाईच आणि डुकराचं मटण आणुन दे.. मग मी तुला त्याबदल्यात माणसाच मटण देतो…
मुलगा खुप विचार करतो बाबांच काय गमक असेल ह्यापाठीमागे…??
बर जाऊदे बाबा म्हणतात ना तर देऊया आणुन…
मुलगा गिधाड गाई आणि डुकराचं मटण आणुन बाबाला देतो…
त्यावर बाबा मुलाला म्हणतात “आता शेवटच एक काम कर” आज संध्याकाळी गुपचूप कुणालाही कळू न देता 12 वा. डुकराचं मटण मशिदीत ठेऊन यायच आणि गाईच मटण मंदिरामध्ये ठेऊन यायच…
सांगीतल्याप्रमाणे मुलगा करतो..
उद्या सकाळी फार मोठी हिंदू-मुस्लीम दंगल होते..
50-60 मुडदे पडतात,
बाबा गिधाड त्यातील एका शरिराच्या मांसाचा तुकडा आपल्या मुलाला घरी घेऊन जातो..आणि आपल्या मुलाला खायला देतो…
प्रत्येक भावकीत बाप गिधाडासारखा असा एक सज्जन विचाराचा फोडा आणि झोडा नितीचा अवलंब करणारा माणूस असतोच असतो.
पण आपण अशा माणसांना किती बळी पडावं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.
आपले विचार, आपली भाषा, आपलं काम यातून आपण कोण आहोत हे समाजाच्या लक्षात येत असतं.
- रमेश पवार ( पंढरपूर )
मुख्यसंपादक