Homeकृषीकुणास म्हणू मी शेतकऱ्यांचा कैवारी दावणीस बांधले सगळे सरकार दरबारी

कुणास म्हणू मी शेतकऱ्यांचा कैवारी दावणीस बांधले सगळे सरकार दरबारी


शेतकरी मित्रहो या देशांमध्ये, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची न्याय्य बाजू घेईल असा नेता असा पुढारी आता अस्तित्वातच राहिला नाही असं वाटायला लागले आहे, राजकीय पुढाऱ्यांनी तर दुकानाच मांडून ठेवलेत पैसे देऊन कार्यकर्त्यांच्या फौजा उभ्या केल्यात स्वतःच्या वोट बँक निर्माण केलेल्या, प्रत्येक पुढाऱ्याने आमदाराने आपापल्या मतदार संघाचा विकास केला नाही मात्र कार्यकर्त्यांचा चांगलाच विकास केला ,आता हे सगळे लाभार्थी कार्यकर्ते आपल्या नेत्याचे झेंडे खांद्यावर घेऊन सर्व मतदार संघामध्ये दहशत निर्माण करत आहेत ,सर्वत्र अनागोंदी माजली आहे सरकारी योजना फक्त आमदाराच्या कार्यकर्त्यांना मीळतात ,शेतात राबणारा खरा शेतकरी या योजनेपासून दूर राहतो लाभार्थी कार्यकर्ते ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद व सर्व शासकीय कार्यालय यांच्यामध्ये धुडगूस घालत आहे आपल्या नेत्याच्या विरोधात कोणी ब्र शब्दही काढला तर लगेच हमरीतुमरीवर येतात खोटे गुन्हे करून त्या बोलणाराचे तोंड कायमचे बंद करतात, प्रशासकीय दहशतवादी सामान्य जनतेला हैराण करून सोडत आहे या राजकीय पुढाऱ्यांकडून गरीब जनतेला किंवा शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही म्हणून शेतकऱ्याची पोरं वेगवेगळ्या शेतकरी संघटनांचे झेंडे बिल्ले मिरवू लागलेत ,आता हे शेतकरी नेते तरी आपल्या कल्याण करतील व शेतकरी प्रश्नाला वाचा फुटेल असं या शेतकऱ्याचं लेकरांना वाटू लागले मात्र तसं झालं नाही ,या शेतकरी नेत्यांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न समजलेच नाही
चुलीमध्ये गौरी जळावी
तसे धुमसत राहतात,
शेतकर्यांचे काही प्रश्न
वर्षानुवर्षे.
अन त्याच चुलीवर ठेवतात ते
सत्तेच बासण

रटारटा शिजवलं जात शेतकर्याच मांस
अर्थहीन चर्चेत चघळले जातात शेतकर्यांचे हाडकं
राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची लचके तोडले मात्र या शेतकरी नेत्यांनी चर्चेच्या नावाखाली उरलेली शेतकऱ्यांचीसर्व प्रश्न स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धगधगत ठेवली, सगळ्याचं शेतकरी संघटनांचे नेते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले, सत्तेसाठी आसुसलेले तथाकथित शेतकरी नेतेच शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले पुढे मंत्री झाले
पक्षाचे प्रचारक झाले तर काहींनी शेतकरी हिताचे सर्व दरवाजे स्वतःहून बंद केले, समोर आलेले प्रश्न न मांडता त्या प्रश्नावर माती लोटून वादाचे झाड लावले आणि ते प्रश्न दुर्लक्षित केले स्वतः मात्र ए सी मध्ये बसून कधीही न सुटणाऱ्या किंवा सोडवण्याची इच्छा नसणार या प्रश्नांवर गप्पा मारत बसले ,या दावणीला बांधलेल्या बैलांना वठणीवर आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ना कुठल्या पक्षासाठी ना कुठल्या संघटनेसाठी आता फक्त आपल्या शेतकरी बापासाठी आहे

         संतोष पाटील
         7666447112
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular