Homeमुक्त- व्यासपीठकोकणातील प्रियकर आपल्या प्रेयसीला प्रपोज करतोय संक्रांतीला !

कोकणातील प्रियकर आपल्या प्रेयसीला प्रपोज करतोय संक्रांतीला !

कोकणातील प्रियकर आपल्या
प्रेयसीला प्रपोज करतोय संक्रांतीला ! कविता आहे.

 तीळगुळ

तू गुळ , मी तीळ
नको गो घालू, प्रेमात खीळ
सन इलो गोडधोडाचो
खरा नि स्पष्ट बोलाचो

रुसना-फुगना पुरे जाला
आता तरी मौन सोड
तीळाक साथ गुळाची तशी
हातात हात माझ्या जोड

मनार घे गो प्रित माझी
नको हाडू निसतोच आव
पाटली फुडली देवाक काळजी
तुजो माजो योक गाव.

माजा मन तुज्यार जडता
तीळार जसो पाक चढता
दोर तुजो,पतंग माजो
पिरतीत तुज्या गो,उंच उडता

बोलीत तुज्या गोडी
आनि गालार आसा तीळ
बघलंय तुका तेवाच
काळजाक पडलो पिळ

तुझ्यासाठी माजो जीव
‘तिळ-तिळ’ तुटता
वायच तरी कर कीव
आता धीर माजो सुटता

मोकळो कर एकदा
संपय ह्यो दुरावो
माज्या प्रेमाचो तुका आता
काय दिव पुरावो

वर्सापाटसून वर्सा गेली
लागाना तुजो ठाव गो
तुज्या शिवाय जगना नको
संक्रांतेक तरी पाव गो.


स्नेहा राणे/बेहेरे.

http://linkmarathi.com/%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%82/

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular